केदार शिंदेंनी वापरला वंदना गुप्तेंसाठी ‘तो’ शब्द; Insta स्टोरी झाली व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये नुसता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर अशो काही भुरळ घातली आहे कि बाईपणाची ताकद बॉक्स ऑफिसवर अगदी स्पष्ट दिसून येतेय. शक्यतो पावसाळ्यात चित्रपट पहायला प्रेक्षक मुद्दाम घराबाहेर जाणं टाळतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत हे चित्र अगदी उलटं झालं आहे. या चित्रपटाने मुसळधार पावसातही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटात शशी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा रविवारी वाढदिवस झाला आणि या निमित्त दिग्दर्शक केदार शिंदेंनी एक हटके पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होतेय.

मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा १६ जुलै रोजी वाढदिवस होता. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी या खास दिवसानिमित्त विविध फोटो, व्हिडीओ आणि मेसेज शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ मंडळींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वंदना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचाही समावेश आहे. केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत फक्त २ शब्दांमध्ये वंदना गुप्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील शशी आपण पाहिली. अत्यंत हौशी, उत्साही आणि प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असणारी. तर ही शशी साकारणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं रिअल लाईफ व्यक्तिमत्व केदार शिंदेंनी सांगितलं आहे… आणि ते ही फक्त २ शब्दांत. इंस्टाग्राम स्टोरीवर केदार यांनी वंदना गुप्तेंचा एक खास फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्या बुलेटवर एकदम हटके अंदाजात पोझ देऊन बसल्याचे दिसले. या फोटोसोबत केदार यांनी लिहिलं, ‘हॅपी बर्थ डे माय डॉन’. केदार शिंदेंनी वंदना यांना डॉन म्हणत या भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही केदार शिंदे यांनी वंदना गुप्ते यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांचा ‘डॉन’ असा उल्लेख केला होता.