खूप कौतुक अन खूप अभिमान!! हृताने ‘या’ कारणामूळे शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट; म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेने विविध मालिका तसेच चित्रपट आणि अगदी नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. निखळ सौंदर्य, सुंदर अभिनय आणि गोड हास्याच्या जोरावर तिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. हृता दुर्गुळे ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे ती नेहमीच विविध लूक, फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आज मात्र हृताने तिचा पती प्रतीक शाहसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याचे अभिनंदन केले आहे.

वर्षभरापूर्वी हृताने तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत सोबत लग्न केलं आणि अनेक तरुणांचं हृदय तोडलं. तरीही तीच फॅनफॉलोईंग आहे ती आहेच. सोशल मीडियावर सक्रिय असणारी ऋता नेहमीच पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. यावेळी तिने नवऱ्याप्रती अभिमान व्यक्त करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हृताने सोशल मिडीयावर प्रतीकसोबतचा एक फोटो पोस्ट करत म्हटलंय, ‘मिस्टर शाह तुमच्या नवीन शोबद्दल अभिनंदन.. तुम्हा सर्वांकडून मिळणारे प्रेम आणि कौतुक पाहून मला खूप आनंद होतो. आपण या कौतुकास पात्र आहात! इतका अभिमान आहे! फक्त इथून पुढे कायम वरच जायचं आहे! आयुष्याभरासाठी तुझा जयजयकार करणारी चियरलीडर’.

हृताने ही पोस्ट इच्छा पती प्रतीक शाह निर्मित ‘शिव शक्ती’ या मालिकेसाठी केली आहे. ही नवी मालिका हिंदी वाहिनी ‘झी टीव्ही’वर सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री निक्की शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हि मालिका ३ जुलै २०२३ रोजी झी टीव्ही वाहिनीवर सुरु झाली असून पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात हि मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक झाली तर आश्चर्य वाटायची गरज नाही.