हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी हि मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासोबतच ती तिच्या कविता आणि सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीमुळे अधिक लोकप्रिय आहे. तिच्या अनेक कविता या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच जगभरात गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याचा सण साजरा केला जात असताना स्पृहाने कृष्णासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्पृहाने एक कविता शेअर केली आहे. ज्यात ती म्हणतेय,
‘दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस..? की पाऊस होऊन येतोस..?
सगळं विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेच, पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत!
उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत!
तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला ..
मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला..?
त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन.. ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात…
तुझा सारासार विचार टोचला असतास आमच्या बुद्धीला…
आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..
किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस..
असो जिथे आहेस तिथे खुशाल अस! इथली फार काळजी करू नको..
दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्त
बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..
स्पृहाने शेअर केलेली हि कविता सोशल मीडियावर नेटकऱ्यांना फार आवडली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देताना स्पृहाने मांडलेल्या विचारांचे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी तिच्या लेखणीचे कौतुक केले आहे. ही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या उत्तम अभिनय कौशल्यासोबतच तिच्या कविता लेखन, सूत्रसंचालन यासाठी लोकप्रिय आहे. स्पृहा जोशीने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज सर्वातच अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या पोस्ट बऱ्याचदा व्हायरल होत असतात. आता तिची ही कविता देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी तिचं कौतुक करत आहे.