Spruha Joshi | अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री स्पृहा जोशी घराघरात लोकप्रिय झालेली आहे. तिने उंच माझा झोका, अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट यांसारख्या मालिकेत काम केले आहे तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिने माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच तिने एका यूट्यूब चॅनलल मुलाखत दिली आणि त्यावर तिचे काही स्पष्ट मत मांडले
यावेळी स्पृहाला काही वर्षांपूर्वी तू एक फोटोशूट केलं होतं त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला होता याविषयी तुला काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने उत्तर मांडले ती म्हणाली की, “ही साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुळात जेव्हा मी फोटोशूट केलं. तेव्हा त्यात फार काही रिव्हिलिंग होतं. त्यात मी होल्डरनेक ब्लाऊज परिधान केला होता. पहिली गोष्ट म्हणजे होल्डरनेक ब्लाउज आत्तापर्यंत कोणी घातलेला नाही अशातला भाग नाही. आपल्या आसपास देखील आपण अनेकजण असे पाहतो.”
हेही वाचा – ‘मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती फक्त बघण्यासाठी…’; पृथ्वीक प्रतापची पोस्ट व्हायरल
पुढे स्पृहा म्हणाली की, “दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पद्धतीची भूमिका जर कोणी करत असेल तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. असा अजिबात नसतो किंवा संबंधित व्यक्ती तशीच आहे. असा अट्टाहास करणे देखील योग्य नाही. अशाने मला कामच करता येणार नाही. कारण सतत मला 800 च्या शतकातील भूमिका कोणीच देणार नाही.”
पुढे ती म्हणाली की, ‘मी जर सतत त्या भूमिका करत राहिले. तर प्रेक्षक आणि कालांतराने मी स्वतः देखील कंटाळून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेण्यासाठी आणि काहीतरी नवनवीन करण्यासाठीच आपण अभिनयाच्या क्षेत्रात येतो. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला परका या प्रवेश करता यावा. ही माझा अभिनयक्षेत्र देण्याचं खरं कारण आहे.” अशा प्रकारे स्पृहाने तिचे मत व्यक्त केलेले आहे.