स्पृहा जोशी हिंदी चित्रपटात झळकणार; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, सूत्रसंचालिका आणि कवयित्री आहे. स्पृहाच्या अभिनयाइतकीच तिच्या लेखणीला धार आहे. त्यामुळे स्पृहाचा प्रत्येक माध्यमात वेगवेगळा चाहता वर्ग आहे. आजवर तिने मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीनंतर आता स्पृहाने हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केले असून तिच्या आगामी चित्रपटाची ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकीकडे स्पृहा तिच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे स्पृहाचा आगामी हिंदी चित्रपट ‘सब मोह माया है’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या या नव्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करताना अभिनेत्री स्पृहा जोशीने कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप…. ? कितना भारी पडेगा ये सौदा फॉर मिश्रा परिवार’.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सरकारी नोकरीसाठी वडिलांच्या मृत्यूचं नाटक कसं रचलं जातं..? अशी एक रंजक गोष्ट पहायला मिळणं आहे. या चित्रपटामध्ये स्पृहाने अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात स्पृहा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रीन शेअर करतं दिसणार आहे. यामध्ये स्पृहा शर्मनच्या पत्नीच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर हे शर्मनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.