‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला. या चित्रपटातील बायकांची फौज जितकी प्रेक्षकांना आवडली तितकाच आवडला या बायकांना हॅण्डल करणारा कबीर. हि मध्यवर्ती भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अव्वल साकारली होती. त्यामुळे सध्या सिद्धार्थची हवा आहे. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकरची फ्रेश जोडी आपल्या भेटीला येत आहे.

‘श्रीदेवी प्रसन्न’ हा मराठमोळा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून पहिल्यांदाच कुल- हँडसम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड- ब्युटीफुल सई ताम्हणकर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या चित्रपट आपल्याला एक नवीकोरी फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे. प्रेम, लग्न, कमिटमेंट आणि संसार यावर आधुनिकरित्या भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन करणार आहे. हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरवरून समजत आहे.

या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर ही ‘श्रीदेवी’ तर सिद्धार्थ चांदेकर हा ‘प्रसन्न’ या भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरच्या सुरुवातीला श्रीदेवी आणि प्रसन्न एकमेकांशी प्रेम आणि लग्नाबाबत चर्चा करताना दिसत आहेत. आता यांची श्रीदेवी आणि प्रसन्न यांची हि प्यारवाली नव्हे तर अरेंजवाली लव्हस्टोरी खुलणार ..? फुलणार ..? विझणार..? का आणखी काही होणार हे तर चित्रपटगृहात कळेल. सिद्धार्थ आणि सईने हा टिझर त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, जगाचं भले ही सेम असेल, पण श्रीदेवी प्रसन्नचं नसतं’, असं कॅप्शन दिलं आहे.