प्रसाद ओक म्हणतोय, ‘तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्यांचे कौतुक करा, कारण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून कार्यरत असलेला आघाडीचा हरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रसाद ओक. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक म्हणून देखील त्याने कला विश्वात स्वतःचे स्थान पक्के केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेमा यासारख्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात कलाकारांना दाद देताना दिसतोय. पण प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि त्यामुळे तो विविध पोस्ट शेअर करतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आहे.

प्रसाद ओक हा सतत सिने सृष्टीला काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असतो. आताही तो ‘वडापाव’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या दरम्यान प्रसादने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामर एक स्टोरी शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसा प्रसाद सोशल मीडियावर कायम सक्रीय दिसतो. पण विविध कॉमिक रील किंवा आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देण्यासाठी तो विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. यावेळी त्याने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये मात्र त्याने गॉसिप्स करणाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे आणि अशा व्यक्तींना टोलाही लगावलाय.

प्रसादने या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्या लोकांचं तुम्ही कौतुक करायला हवं. कारण त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या सोडून ते तुमच्या समस्यांबद्दल चर्चा करतात आणि ही अजिबात सोपी गोष्ट नाही’. प्रसादची हि पोस्ट गॉसिप करणाऱ्या प्रत्येकासाठी एक टोला आहे. त्यामुळे समजने वाले को बस इशारा काफी है।

अभिनेता प्रसाद ओकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो लंडनमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘वडापाव’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘वडापाव !!! गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ अशी याची टॅगलाईन असून हा एक कौटुंबिक हलकी फुलकी कॉमेडी असणारा चित्रपट आहे.