‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ मनोरंजनाचा फॅमिलीपॅक ठरणार; चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच आगामी मराठी चित्रपट ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टिझर अगदी शीर्षकाप्रमाणे आहे. एकदम स्वीट. सोशल मीडियावर ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टिझर प्रचंड व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमधून या कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

चित्रपटाच्या टीझरवरून समजतंय कि, ‘खूप वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. पण बाबांना भेटल्यावर मात्र त्याची निराशा होते आणि तो चिडचिड करू लागतो’. संजूच्या चिडचिड करण्यामागचं कारण नेमकं काय आहे..? हे जाणून घेण्यासाठी ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. संजू आणि त्याच्या बाबांची भेट आणि इतकी वर्ष संजूच्या आईने त्याच्यापासून लपवलेली ही गोष्ट प्रेक्षकांना मात्र मजा देणारी ठरणार आहे. येत्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘शॉर्ट अँड स्वीट’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे आणि याची कथा नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळी तशीच हटके आहे. या चित्रपटात यूट्यूबर आणि रील विश्वातील प्रसिद्ध चेहरा तुषार खैर आणि कॉमेडी किंग ओमकार भोजनेदेखील कमालीच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले आहे. पायल गणेश कदम आणि विनोद राव हे या चित्रपटाचे निर्माते असून स्वप्नील बारस्कर यांचे लेखन असून राहुल जाधव यांचे छायाचित्रण आहे.