‘सुभेदार’ चित्रपटाचा Book My Show’वर डंका; रिलीजआधीच केला ‘असा’ रेकॉर्ड


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे श्री शिवराज अष्टकातील चार चित्रपट तुफान गाजले. यानंतर आता पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होऊ घातला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता रिलीजआधीच या चित्रपटाने एक भव्य विक्रम आपल्या नावे केला आहे.

सुभेदार हा चित्रपट नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारीत आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान ‘सुभेदार’ चित्रपटाने रिलीजआधीच एक नवीन रेकॉर्ड केलाय. प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर ४० हजाराहून अधिक इंटरेस्ट लाईक्स मिळालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. यावरून किती प्रेक्षक रिलीजआधीच ‘सुभेदार’ चित्रपट पहायला उत्सुक आहेत ते समजत आहे. मुख्य म्हणजे बुक माय शो’वर असा रेकॉर्ड करणारा सुभेदार हा पहिलाच मराठी चित्रपट असल्यामुळे संपूर्ण टीम आनंदी आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर हे नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ठिकठिकाणी जाऊन चित्रपटातील कलाकार मंडळी प्रमोशन करताना दिसत आहेत.