Suchitra Bandekar | रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरीजमध्ये मराठमोळ्या सुचित्रा बांदेकरची वर्णी, ट्रेलरने वेधले लक्ष


Suchitra Bandekar | मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती नाटक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. परंतु आता सुचित्राच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असणार आहे. कारण लवकरच सुचित्रा एका हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसिरीज ट्रेलर देखील नुकताच रिलीज झाला आहे. आणि यामध्ये सुचित्राची झलक पाहायला मिळालेली आहे.

हिंदीतील इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमध्ये सुचित्राची झलक पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी विवेक ओबेरॉय, ईशा तलवार, श्वेता तिवारी यांसारख्या कलाकारांचा समावेश असणार आहे. दिल्लीत स्फोट करून पळ काढलेल्या आरोपींचा शोध पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असलेले सिद्धार्थ आणि विवेक घेणार आहेत. या वेबसिरिजचा ट्रेलर देखील आला आहे. रोहित शेट्टीने दिग्दर्शन केलेल्या या वेबसिरीजमध्ये सुचित्रा बांदेकर आपल्याला एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

याबद्दलची माहिती स्वतः सुचित्रा यांनी दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर या वेबसिरीजचा ट्रेलर शेअर केला आहे. आणि तो ट्रेलर शेअर करून दिले आहे की, “नक्की पहा आशीर्वाद द्या” तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार अभिनंदन करून तिला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – Bhagya Dile Tu Mala | ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत विदिशा म्हसकरची एंट्री, मालिकेला येणार नवे वळण

रोहित शेट्टी याची इंडियन पोलीस फोर्स ही वेबसिरीज 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सिरीज ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये सुचित्रासोबत शरद केळकर आणि वैदही परशुरामी हे मराठी कलाकार दिसणार आहेत.