हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनवीर अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना दररोज न चुकता पाहतात. या सर्वच मालिकांमधील पात्रे प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेली असतात. तसेच प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम, टीका, राग हा कलाकारांसाठी त्यांच्या कलेला मिळणारी दाद असते. अशी दाद ज्या भूमिकेसाठी मिळते ती भूमिका त्या त्या कलाकारासाठी देखील अत्यंत जवळची असते. नुकताच १००० भागांचा टप्पा करत करत ‘सहकुटुंब सहपरिवार’ हि मालिका निरोपाकडे मार्गस्थ झाली आहे. मालिकेला निरोप देताना अभिनेता सुनील बर्वे यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
नात्यांचं महत्त्व पटवून देणाऱ्या कथानकावर आधारलेली ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेतआहे. मालिकेला निरोप देताना जितके प्रेक्षक भावुक झाले आहेत तितकेच कलाकार देखील भावुक झाले आहेत. या मालिकेच्या कलाकारांनी नुकतंच सेटवरचा शेवटचा दिवस एकत्र साजरा केला आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सगळेच भावुक झाल्याचे दिसले. नुकतंच अभिनेते सुनील बर्वे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर मालिकेला निरोप देताना अत्यंत भावुक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेत सुनील बर्वे हे सुर्या मोरे नामक भूमिका साकारताना दिसले आहेत. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आहे.
सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी ‘सूर्य मोरे’ या भूमिकेचे शर्ट आणि काही वस्तूंची झलक दाखवली आहे. सोबत लिहिलंय, ‘ह्या कपड्यांमधून बाहेर पडणं खूप त्रासदायक होतं. ८/०२/२०२० रोजी पहिल्यांदा आणि २०/०७/२०२३ रोजी मी ते शेवटचे परिधान केले. ह्या सुर्यादादा पात्राला खूप प्रेम दिलं प्रेक्षकांनी, आणि सहकलाकारांनी!माझ्या कारकिर्दितली अजून एक प्रिय, महत्वाची मालीका! अत्यंत जड मनाने मी ह्या पेहेरावाला निरोप दिला. पुन्हा नवं काही सुरू होईलंच, त्याच्या प्रतिक्षेत असे पर्यंत हा, गेल्या साडे तीन वर्षांचा काळ मनात घुमत राहील!!’ दरम्यान स्टार प्रवाहवरील मोरे कुटुंब १००० भाग पूर्ण करत गोड शेवटाने प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.