Sunny Leone : डोक्याला जखम, आजूबाजूला जंगल अन इंटरनेट नाही; सनीचा नवीन व्हिडिओ पाहिला का?


Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सानी लिओनी आपल्या मादक अदांनी नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते. सनी सोशल मीडियातून चाहत्यांसोबत संपर्कात राहते. सनीच्या फॅशन आणि लूकवर (fashion) अनेकजण आजही फिदा होतात. सनी रोज आपला वेगळा लूक तिच्या इंस्टाग्रामवर शेयर करून फॅन्सला खुश करते. आता सनीचा एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे चाहत्यांना सनीची काळजी वाटू लागली आहे.

या व्हिडीओ मध्ये सनी लिओनी एका लहान बोटीतून प्रवास करताना दिसत आहे. तिच्या डोक्याला चांगलाच मार बसलेला दिसतोय तर आजूबाजूला घनदाट जंगल आहे. सनी एका हातात मोबाईल पकडून नेटवर्क (Mobile Network) शोधत आहे. मात्र तिला काही केल्या नेटवर्क मिळत नाहीये. हा व्हिडीओ सनीने शेअर करून त्याला जेव्हा तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसते असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, सनीचा हा व्हिडीओ तिच्या लेटेस्ट सुरु असलेल्या एका शूट दरम्यानचा असल्याचे समजत आहे. सानी सध्या एका हॉलिवूड चित्रपटाच्या शूट करता परदेशात आहे. तेव्हा एका स्पेशन शूटसाठी सनीने एका लेकव्हिव्हला भेट दिली. या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने सनीचा गोंधळ उडाला होता. याच परिस्थितीचे चित्रीकरण तिच्या सहकलाकाराने केले अन सध्या ते व्हायरल होत आहे.