हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत दिसत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्या चाहत्यांच्या शेअर करत असतात. सध्या त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोत सुप्रिया पाठारे यांच्यासोबत अभिनेता प्रथमेश परब दिसतो आहे. नुकताच सुप्रिया यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये प्रथमेश जेवताना दिसतो आहे. तर सुप्रिया त्याच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत. सोबतच जेवता जेवता प्रथमेश सुप्रिया यांच्यासोबत गप्पा मारताना आणि हसताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करता सुप्रिया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मी आणि पप्या भेटलो की गप्पा संपतच नाही’. हा फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
सुप्रिया पाठारे आणि प्रथमेश परब यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. या फोटोवर प्रथमेशने ‘आय लव्ह यु’ असा रिप्लाय दिला आहे. तर एका चाहत्याने कमेंट करून लिहिलंय, ‘मराठी कलाकारांनी एकमेकांना साथ दिली तरच आपण कला क्षेत्रात पुढे जाऊ शकू, बिन कामाचे गट पाडून काहीच फायदा नाही’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘भाईची केळवण’. अशा अनेक कमेंट या फोटोवर पाहायला मिळत आहेत.