हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी मंडळी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशीच एक खास पोस्ट मराठी मनोरंजनसृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री सुरभी भावेने शेअर केली आहे. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले असता तिने शाब्दिक फटाक्यांनी ट्रोलर्सची दिवाळी केली आहे. सुरभीने दिवाळीनिमित्त पोस्ट शेअर करताना लिहिले कि, ‘दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने एक आवाहन हवेत आधीच खूप प्रदूषण आहे, त्यात फटाके वाजवून भर टाकण्या पेक्षा एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो किंवा उत्तम वाचन, उत्तम सिनेमा, उत्तम नाटक असे सर्व पाहून दिवाळी साजरी करू शकतो…’
पुढे लिहिलं, ‘P.S आता जे मला उपदेशाचे डोस पाजतील की तू पण फटाके वाजवतच असशील वगैरे तर त्यांच्यासाठी, मी 4 थी मध्ये असताना कारगिल युद्ध झालेल. त्यावेळी मी फटाके न घेता गावात पैसे गोळा करून ते सैनिकांना दिलेले, तेव्हापासून मी जे फटाके वाजवणं बंद केलं ते आजतागायत मी फुलबाजी पण लावलेली नाही’.
या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चाहत्यांनी तिची बाजू भक्कम केली. दरम्यान एका ट्रोलरच्या कमेंटवर सुरभीने प्रतिक्रिया देत म्हटले, ‘माझा मूळ मुद्दा न कळताच अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली…. माझ्या आधीच्या पोस्टला उगाच ट्रोल करून timepass करणाऱ्याना मी शहाणपण स्वतःकडे ठेवायचं की त्याचं प्रदर्शन मांडायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही…’
पब्लिसिटीची गरज नाही. अभिनेत्री असल्याने अनेक जण ओळखतात… रोजगार मिळतो ते दिसतं पण फटाका बनवताना कित्येक बालमजूरांचं शोषण होत, त्यांचा मृत्यू होतो ते नाही दिसत का…?’ ‘कारगिल च भांडवल करावं हा मुद्दा तुमच्या डोक्यातून आला माझ्या नाही, नुसतं विवेकानंदांचा फोटो लावून काही होत नाही विचार आचरणात आणा… हा आता तुमचा फटाक्यांचा बिझनेस असेल तर झोंबेल तुम्हाला हे आणि हो मी हिंदू असल्याचा मला नितांत अभिमान आहे ह्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेट ची गरज नाही, बाकी तुमचा शहाणपण घरात दाखवत असालच … गेट वेल सून अकलेचे रॉकेट उडवा आणि विचारांचे अनार उडवा… आणि हो लवकर डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना ती सोडून बघा जग सुंदर दिसेल’.