सुरुची अडारकर आणि पियुष रानडेचा शुभविवाह संपन्न; अभिनेत्याने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हि माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केल्यानंतर अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सुरुची अडारकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सुरुची नववधूच्या रुपात तर पियुष वर वेशभूषेत दिसत आहे. या फोटोत पियुष रानडे सुरुचीच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे. सुरुचीने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘आनंदाचा दिवस’ असे लिहिले आहे. तसेच PSILoveYou असा हॅशटॅग वापरला आहे.

या नव्या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकरी, चाहते आणि सिनेविश्वातील कलाकार मंडळी कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. माहितीनुसार, अभिनेता पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. याआधी तो अभिएन्ट्री शाल्मली टोळ्येसोबत विवाहबंधनात अडकला होता. काही वर्षांनी त्यांनी काडीमोड घेतला आणि पियुषने मयुरी वाघसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. यानंतर आता त्याने तिसऱ्यांदा अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत सप्तपदी घेतली आहे.