Suruchi Adarkar And Piyush Ranade| सध्या लगीन सराई चालू आहे. आणि अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. अशातच काbरे दुरावा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची आडरकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी लग्न गाठ बांधली आहे. त्या दोघांच्या प्रेमाबद्दल देखील कोणाला माहीत नव्हते. आणि लग्नाबद्दल देखील नाही त्यांनी लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना ही बातमी समजली. अशातच त्यांच्या मेहंदी समारंभाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे आणि त्याला साजेशी हेअर स्टाईल देखील केलेली आहे या व्हिडिओमध्ये ते दोघे खूपच सुंदर दिसत आहे . तसेच पियुश मेहंदीचे ताट हातात घेऊन उभे आहेत. दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करून सुरूचिने “अ ड्रीमी मेहंदी” असे कॅप्शन दिले आहे.
सुरुची आणि पियुष यांनी पुण्यामध्ये लग्न केले आहे. याची कोणालाही माहिती नव्हती. संध्याकाळी त्यांनी हे फोटो शेअर केले. त्यांचे रिसेप्शन देखील झाले. त्यावेळी श्रेया बुगडे, भक्ती देसाईz हर्षद अटकरी यांसारखे कलाकार लग्नात उपस्थित होते. पियुष रानडे सध्या काव्यांजली या मालिकेत काम करत आहे.