‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत सुरुची अडारकरची एंट्री; साकारणार ‘हि’ महत्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील रहस्यांचा शोध मालिकेला सतत चर्चेत ठेवत असतो. सध्या या मालिकेत पंचपीटीका रहस्याचा शोध सुरू आहे. जो प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवतोय. मालिकेत रुपालीचं विरोचक आहे हे सत्य अद्वैतसमोर आल्यानंतर आता त्याच्या जीवाला आणखीच धोका वाढला आहे. पण विरोचकाआधी त्याची सावली नेत्रासाठी धोका तयार करणार आहे.

सुरुवातीला प्रोमो समोर आल्यानंतर कोण असेल ही विरोचकाची सावली..? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर याचे उत्तर समोर आले आहे. अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सुरुची अडारकर आता या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत येत आहे. अत्यंत वेगळा लूक आणि अत्यंत वेगळ्या भूमिकेतून सुरुची अडारकर प्रेक्षकांच्या भेटीस यायला सज्ज झाली आहे. माहितीनुसार, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत विरोचकाची सावली म्हणजेच नागिणीच्या भूमिकेत सुरुची दिसणार आहे.

या मालिकेमुळे सुरुची अडारकर पुन्हा एकदा झी मराठीसोबत काम करताना दिसणार आहे. या नव्या भूमिकेबाबत स्वतः सुरुची आणि तिचे चाहते तिला या भूमिकेत पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. मालिकेतील या नव्या ट्विस्टमुळे मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढताना दिसतो आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या पात्राच्या एंट्रीचा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे. हा विशेष भाग उद्या ६ जानेवारी २०२४ रोजी झी मराठी वाहिनीवरील प्रसारित होणार आहे.