‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत नागिणीची एंट्री; प्रेक्षक म्हणाले, ‘दर्जा गेला रे..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली होत. मालिकेचे कथानक अत्यंतलक्षवेढू , रहस्यमय आणि उत्सुकता वाढवणारे होते. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेला पोराचांड प्रेम दिले. सध्या या मालिकेचा ट्रॅक फारच वेगळ्या वळणावर असताना एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांच्यासह आता सुरुची अडारकर महत्वपूर्ण भूमिकेत दिसते आहे. सुरुचीच्या वाटेला नागीणीची भूमिका आली असून तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा नवा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुरुची अडारकरची एंट्री दाखवण्यात आली आहे. सुरुची विरोचकाची सावली म्हणून नागिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सोनेरी रंगाचे कपडे, सापासारखे डोळे अगदी एकता कपूरची सीरिअल चालू आहे असं वाटतंय, म्हणत नेटकऱ्यांनी मालिकेच्या दर्जावर भाष्य केले आहे. सुरुचीचा नागीण लूक काही प्रेक्षकांना आवडला असला तरी काहींनी मात्र सुरुचीला आणि मेकर्सला चांगलेच ट्रोल केले आहे.

हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर काहींनी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेची तुलना एकता कपूरच्या ‘नागीन’ या मालिकेशी केली आहे. तर अनेकांनी सुरुचीच्या अभिनयावर टीका केली आहे. काहींनी मेकर्सच्या बुद्धीवर भाष्य केले आहे.

एकाने कमेंट करत लिहिले, ‘या सिरीयलला नागीणचा लूक का दिला आहे. कसली फालतू अॅक्टिंग दिसतेय सुरुचीची’. तर दुसऱ्याने लिहिले आहे, ‘दर्जा गेला सिरियलचा’. आणखी एकाने म्हटले, ‘काय फालतुगिरी लावलीये..सीरिअल बंद करा’. अन्य एकाने, ‘हसायला येतंय’ म्हटलं तर आणखी एकाने, ‘काय तमाशा लावलाय हा… लॉजिक..??अशी कमेंट केली आहे.