‘रोमँटिक पोस्ट.. स्पेशल गिफ्ट..’; स्वानंदने ‘असा’ साजरा केला बायको गौतमीचा वाढदिवस


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचली. गौतमीने गेल्यावर्षी २५ डिसेंबर रोजी प्रियकर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर आज गौतमीचा पहिला वाढदिवस आहे. जो अत्यंत खास आहे. त्यामुळे आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त स्वानंद तेंडुलकरने सोशल मीडियावर एक छान पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होते आहे.

आज ३१ जानेवारी रोजी गौतमी देशपांडे तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करते आहे. गौतमीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते, नेटकरी, मित्र मंडळी, कुटुंबीय वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान गौतमीचा पती स्वानंद तेंडुलकर कसा मागे राहील. स्वानंदने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर गौतमीसोबतचा एक सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिलंय, ‘या सुंदर स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याबद्दल कृतज्ञ आहे. तुला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद’.

याशिवाय स्वानंदने गौतमीला तिच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर असं गिफ्टसुद्धा दिलं आहे. त्याने बायको गौतमीला युकुलेल (एक चारतारी छोटे तंतुवाद्य) गिफ्ट म्हणून दिले आहे. गौतमी जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम गायिका आहे. त्यामुळे हे गिफ्ट तिच्यासाठी फार खास आहे. दरम्यान, गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकर हा ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा व्हाईस प्रेसिडंट आहे. लग्नानंतर स्वानंद आणि गौतमी दोघेही मजेशीर रिल्स बनवताना दिसत आहेत. ज्याला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो.