साखरपुड्यानंतर स्वानंदी- आशिषची पहिलीच रोमँटिक ट्रीप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची अत्यंत गाजलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हि आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत मीनल हे पात्र साकारत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर चांगलीच चर्चेत आली. हळूहळू स्वानंदीच्या चाहता वर्ग वाढू लागला आणि आज तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येत फॉलोवर्स आहेत. अलीकडेच तिने आपल्या रिलेशनशिपबाबत घोषणा केली होती. यानंतर लगेच दोन दिवसांत तिचा आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपूडा झाला. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच दोघे स्पेशल ट्रीपवर गेले आहेत. ज्यातील एक फोटो व्हायरल होत आहे.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा जुलैमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा संपन्न झाला. स्वानंदी- आशिषच्या साखरपुड्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत. आता साखरपुड्यानंतर स्वानंदी आणि आशिष पहिल्यांदाच मस्त फिरायला बाहेर गेले आहेत. त्यांच्या या स्पेशल ट्रिपमधील एक फोटो त्यांनी अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. या फोटो स्वानंदी आणि आशिष दोघेही धबधब्यात भिजताना दिसत आहेत.

या फोटोत स्वानंदी आणि आशिष अत्यंत खुश दिसत आहेत. स्वानंदी आणि आशिषने मस्त गॉगल लावून भन्नाट पोज देत हा फोटो क्लिक केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा क्युट फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना स्वानंदीने ‘निर्भेळ आनंद’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर तिचे चाहते, नेटकरी आणि अनेक सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. तर आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. येत्या महिन्यांत हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.