Swanandi- Ashish Wedding| ‘मंगळसूत्राच्या दोन वाट्या…’ स्वानंदीने घेतला आशिषसाठी भन्नाट उखाणा


Swanandi- Ashish Wedding | नुकतेच दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंद टिकेकर आणि इंडियन आयडल 12चा गायक आशिष कुलकर्णी यांनी लग्नगाठ बांधली आहे. स्वानंदी आणि आशिष यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरस झाले आहेत. त्यांच्या लग्ना आधीचे सगळे विधी देखील त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या लग्नात स्वानंदीने आशिषसाठी एक खास उखाणा घेतला आणि तो उखाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

हेही वाचा –सईबाई, काय हे बाई..? अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘हि बघा मराठी उर्फी..’

सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, स्वानंदी आशिषसाठी एक उखाणा घेत आहे. तिने असा उखाणा घेतला आहे की, मंगळसूत्राच्या दोन वाट्या बाहेर सासरची खून आशिषच नाव घेते कुलकर्णी यांची सून. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे.

स्वानंदी आणि आशिष यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. आणि लाल रंगाची शॉल घेतली आहे. तर आशिषने स्वानंदीच्या साडीला मॅचिंग असा ऑफ व्हाईट कलरची शेरवानी परिधान केलेली आहे.