तू एकमेव..!! स्वानंदी- आशिषचा दणक्यात साखरपुडा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून अभिनेरे उदय टिकेकर यांची लेक अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रकाश झोतात आली. यानंतर तिचा चाहता वर्ग वाढतच गेला. स्वानंदीने अलीकडेच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह फोटो शेअर करत आपल्या प्रमाचा कबुली दिली होती आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला. यानंतर आता स्वानंदी आणि आशिष यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत

‘आमचं ठरलं..’ म्हणत स्वानंदीने गायक आशिष कुल्कर्णीसोबतचा फोटो शेअर करत आपण रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न बंधनात अडकणार आहोत अशी माहिती दिली होती. यानंतर गेल्या २ दिवसांपासून स्वानंदीच्या साखरपुड्याची टिकेकरांच्या घरी जय्यत तयारी सुरु होती. दरम्यान स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तिफण व्हायरल झाले होते.

अखेर रविवारी स्वानंदी आणि आशिष यांचा साखरपुडा पार पडला आणि दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद खुलला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने तिच्याअधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अधिकृत घोषणा केली आहे कि, ‘…आणि आम्ही बंधनात अडकलो (And We’re Engaged!)’.

तर आशिषने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तू माझे घर आहेस, माझे एकमेव घर आहेस! (You are my home, my only home!) आपल्या साखरपुड्यासाठी स्वानंदीने पेस्टल पिस्ता रंगाची साडी नेसली होती. तर आशिषने स्वानंदीसोबत ट्विनिंग करत तिच्या साडीच्या रंगाला मॅचिंग जॅकेट आशिषने परिधान केले होते. याशिवाय स्वानंदीने लाईट पिंक कलरचा लेहंगा आणि आशिषने ब्लु कलरची शेरवानी परिधान केली होती. आपल्या अंगठ्यांचा फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे.