हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून मराठी सिनेविश्वात जणू लग्नाची लाट आली आहे. या आठवड्याभरात तर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकले. यातच अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांची जोडीदेखील अखेर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर त्याच्या विवाह सोहळ्यातील अत्यंत गोड असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वानंदी आणि आशिष दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत रोमँटिक कॅप्शन दिले आहेत.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांचा २५ डिसेंबर २०२३ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या हळदी, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातील अनेक फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहेत. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी दोघांनीही सोशल मीडियावर लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत. स्वानंदीने हे फोटो शेअर करताना ‘आयुष्यभराची # आनंदी साथ’ असा हॅशटॅग वापरून कॅप्शन शेअर केले आहे.
आशिष आणि स्वानंदीच्या नावातील काही अक्षरं एकत्र करून ‘आनंदी’ हा हॅशटॅग तयार करण्यात आला होता. ज्याचा पूर्ण विवाह सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला गेला. याशिवाय आशिष कुलकर्णीने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी आनंदी’ असे कॅप्शन दिले आहे. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नासाठी त्यांनी केलेले लूक कमालीचे लक्षवेधी होते. स्वानंदीने पिवळ्या रंगाची पैठणी तर आशिषने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि हे दोघेही एकमेकांना अनुरूप दिसत होते.