स्वानंदीचा ‘मोदक’ झाला ‘मोमो’; अभिनेत्रीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जो तो बाप्पाच्या भक्तीत दंग झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी देखील त्यांच्या घरगुती बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सारेच जाणतो कि बाप्पाचा मोदक किती प्रिय आहेत. त्यामुळे घराघरात विविध प्रकारचे मोदक बनविले जात आहेत. आता मोदक बनवण सगळ्यांना जमतंच असं नाही. अशीच गंमत अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचीसुद्धा झाली आहे.

बाप्पा आला म्हटल्यावर त्याचे कौतुक करायला स्वानंदी सज्ज झाली. तीनेसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केला. दरम्यानचा एक व्हिडीओ तिने आवर्जून अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वानंदी उकडीचे मोदक बनवताना दिसत आहे. पण खूप प्रयत्न करुनही स्वानंदीला मोदकाच्या कळ्या काही जमल्या नाहीत. त्यामुळे तिचा मोदक आकाराने काही मोदक झाला नाही. पण मोमोज सारखा मोदक मात्र तिने बनवला आणि या व्हिडीओला तिने ‘मोदकचा झाला मोमो’ असं कॅप्शन देऊन टाकलं आहे.

स्वानंदीच्या हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे तिचा हा गोड प्रयत्न नेटकऱ्यांना आवडला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत स्वानंदीला चिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अनेकांनी तिच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. यामध्ये अभिनेता यशोमन आपटेने देखील कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘वाह!!! ओ कुलकर्णी!!! मुलीला मोदक जमत नाहीत! आता बसा बोंबलत’. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, ‘खाणंच सोप आहे… जावू द्या करायच्या भानगडीत नका पडू’.