लग्नानंतर स्वानंदी गेली हिमाचल फिरायला; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘फाटलेले ओठ, सुजलेला चेहरा..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्यावर्षी २५ डिसेंबर २०२३ रोजी मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने तिचा प्रियकर आणि प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांचा शाही विवाह सोहळा हा पुण्यात पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नानंतर स्वानंदी आणि आशिष यांच्या सहजीवनाची सुरुवात झाली आहे. दरम्यान नुकतेच स्वानंदीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हिमाचलला फिरायला गेल्याचे समजत आहे.

स्वानंदीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर हिमाचलच्या बर्फाळ आणि थंड वातावरणाचा आनंदी मनसोक्त आनंद घेते आहे. स्वानंदीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर तिचे वडील अभिनेते उदय टिकेकर यांनी हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. तर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. स्वानंदीने हे फोटो शेअर करत ‘प्रेम आणि कृतज्ञतेने परिपूर्ण’ असे कॅप्शन दिले आहे.

तर व्हिडिओसोबत तिने, ‘फाटलेले ओठ, सुजलेला चेहरा, थंड हात पण सर्व काही उबदार आणि प्रेमाने भरलेले वाटते!!’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, या फोटो- व्हिडिओवरून स्वानंदी हिमाचलला फिरायला गेल्याचे समजत आहे. पण यातील एकही फोटोत तिचा नवरा म्हणेजच गायक आशिष कुलकर्णी दिसत नाही. त्यामुळे स्वानंदी नाकी आशिषसोबत फिरायला गेली आहे..? एकतरी गेली आहे..? मित्र मैत्रिणींसोबत गेली आहे..? का एखाद्या शूटसाठी..? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.