‘.. असं स्वागत व्हायला भाग्य लागतं’; परदेशातून परतल्यानंतर मुलांची कृती पाहून स्वप्नील झाला भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपट, सिरीजमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यामुळे स्वप्नील जोशीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय स्वप्नील सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय असतो आणि यामुळे त्याच्या फॉलोवर्सचा आकडासुद्धा खूप मोठा आहे. नुकताच स्वप्नील त्याच्या आगामी चित्रपटाचे परदेशातील शेड्युल संपवून मायदेशी परतला आहे. दरम्यानचा एक क्युट व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बाहेरगावी गेलेला स्वप्नील जेव्हा मायदेशी परतला तेव्हा त्याच्या मुलांनी एअरपोर्टवर त्याचे स्वागत केले. या व्हिडिओतील तो क्षण अत्यंत भारावणारा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वप्नील जोशीने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबई एअरपोर्टवर स्वप्नील आणि त्याची दोन्ही मुलं मायरा आणि राघव दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये स्वप्नीलला पाहताच त्याची मुलं मायरा आणि राघव त्याच्याकडे धावत येतात अन बाबाला मिठी मारतात. यावेळी छोट्या स्वप्निलच्या लेकाने म्हणजेच राघवने बाबासाठी तयार केलेलं खास वेलकम ग्रिटींग कार्डदेखील दिसत आहे. स्वप्नील जोशीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘Been there done that…there is no place like “being loved” !!! मायदेशी परत आल्यावर असं स्वागत व्हायला भाग्य लागतं’. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ‘क्युट’, ‘किती गोड’ अशा कमेंट्स केल्या आहेत.