खूप मजा.. खूप धमाल.. खूप सेल्फी!! स्वप्नील जोशीची लेकीसोबत क्युट डेट नाईट; कारणही होतं खास, म्हणाला…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या उत्तम कलाकृतींची स्वप्नीलने घेतलेली मेहनत हि कौतुक करण्याजोगी आहे. यामुळे अनेकदा स्वप्नीलला प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना फॅमिलीसाठी वेळ देणं अवघड झालं असेल. पण स्वप्नील जितका उत्तम नट आहे तितका उत्तम फॅमिली मॅन सुद्धा आहे. त्यामुळे आजपर्यंत स्वप्नीलने व्यग्र वेळापत्रकातूनदेखील आपल्या कुटुंबासाठी आवर्जून वेळ दिला आहे. आताही तो आपल्या लेकीसोबत डेटवर गेला होता. ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्वप्नील जोशी त्याच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. आगामी प्रोजेक्ट्स आणि फॅमिली टाइम अशा वेगवेगळ्या पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच स्वप्नीलने त्याची लेक मायरासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हि बाप- लेकीची डेट होती बरं का.. तर हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नीलने लिहिलं, ‘लेकीसह डेट नाईट…. तिनं तिच्या शाळेत मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये बक्षीस जिंकले आणि मी तिला डेटसाठी घेऊन आलो’.

या व्हिडीओमध्ये स्वप्नील आणि त्याची लेक मायरा दोघेही मस्त धम्माल- मस्ती करताना दिसत आहे. स्वप्नील आणि मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी काम आणि कुटुंबात बॅलन्स करणाऱ्या स्वप्नीलचे अगदी भरभरून कौतुक केले आहे. आता स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ‘इंद्रधनुष्य’ आणि ‘जिलबी’ या आगामी चित्रपटांमध्ये स्वप्नील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.