‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत; साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकले. काहींनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. काहींनी गुपचुप साखरपुडे उरकले. यांमध्ये मुग्धा- प्रथमेश, स्वानंदी- आशिष, गौतमी- स्वानंद, सुरुची- पियुष या लोकप्रिय जोड्या लग्नबंधनात अडकल्या. यानंतर आता लवकरच आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळेने अलीकडेच गुपचुप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे. शिवाय ती लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून अभिनेत्री स्वरदा ठिगळे प्रसिद्धी झोतात आली. शिवाय ती सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. ज्यामुळे तिच्या फोलवर्स ची संख्या चांगलीच मोठी आहे. तिने सोशल मिडियाच्याच माध्यमातून आपल्या साखरपुड्या चा थेट व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. स्वरदाने शेअर केलेला हा साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे तर या व्हिडिओवर तिचे चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत तिच्यावर शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी देताना कॅप्शनमध्ये आपल्या कुटुंबाचे आणि मित्र मंडळींचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री स्वरदा ठिगळे ने तिच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, ‘जर आयुष्यात योग्य व्यक्तीला तुम्ही भेटलात, तर तुम्ही त्या व्यक्तीला नाही कसं म्हणू शकता? आमच्या या आनंदात सहभागी झाल्याबद्दल कुटुंबीयांचे आणि सर्व मित्रमंडळींचे खूप खूप आभार!’ अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे आणि इंस्टाग्रामवर नमूद केल्यानुसार तो इंटिरियर डिझायनर असल्याचे समजत आहे. स्वरदाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. मात्र, २०२१ साली ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.