‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे निधन; कलर्स मराठीने वाहिली श्रद्धांजली

Umesh Namjoshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करीत प्रेक्षकांचे उत्तम कलाकृती देणारे दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेश नामजोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेता … Read more

‘सुंदरा..’ फेम अभिनेत्याचे अशोक सराफांकडून कौतुक; म्हणाला, ‘हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण..’

Sameer Paranjape

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता समीर परांजपे सध्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या नव्या पर्वातून आपल्या भेटीस आला आहे. मालिका संपल्यानंतर आता समीर आपल्या श्रवणीय आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकतोय. नुकतेच या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पाहुणे म्हणून हजर राहिले … Read more

‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक; व्हिडिओतून केले कारण स्पष्ट

Rama Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या लोकप्रियतेमूळे तग धरून आहे. टीआरपी कमी असल्यामुळे खरंतर या मालिकेचा देखील पत्ता कट होणार होता. लवकरच ‘रमा- राघव’ मालिका बंद होणार अशा बातम्यांनी देखील जोर धरला. पण पुढे कथानकातील वळणे पाहून प्रेक्षकांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिला आणि हि मालिका सुरु राहिली. मालिकेतील रमा … Read more

Yogyogeshwar Jai Shankar – ‘यासाठी मी आजन्म ऋणी…’; शंकर महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता झाला व्यक्त

Yogyogeshwar Jai Shankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Yogyogeshwar Jai Shankar) अलीकडेच कलर्स मराठी वाहिनीवरील अध्यात्मिक मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि मालिका संपली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र मध्यंतरी मालिकेचा टीआरपी घसरला, प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला आणि त्यामुळे अचानक या मालिकेला निरोप घ्यावा लागला. या मालिकेत शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळने उत्तमरित्या पार पाडली होती. तब्बल … Read more

Sindhutai Sapkal -‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’; चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Sapkal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sindhutai Sapkal) कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई– चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची … Read more

‘हा प्रवास कधी संपला…’; ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकरची पोस्ट व्हायरल

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा होस्ट अक्षय केळकर हा बिग बॉस मराठी सीजन ४ चा विजेता आहे. बिग बॉस नंतर अक्षयने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून ‘ढोलकीच्या तालावर’ हा शो होस्ट केला. या कार्यक्रमादरम्यान त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण आता हा कार्यक्रम महाअंतिम सोहळ्यासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘ढोलकीच्या … Read more

अंतरा- मल्हारचा प्रवास संपला; ‘जीव माझा गुंतला’ मालिकेने घेतला प्रेक्षकांना निरोप

Jeev Maza Guntala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यातील बऱ्याच मालिका केवळ टीआरपी मिळत नसल्यामुळे बंद करण्यात आल्या. यातील कितीतरी मालिकांचे कथानक देखील पूर्ण झाले नव्हते. केवळ टीआरपी कमी असल्यामुळे या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. तर काही मालिकांचे कथानक सुफळ संपूर्ण झाल्यानंतर मालिका संपल्या. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या … Read more

‘दुर्दैवाने माझ्या वैयक्तिक कारणांमुळे..’; ‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

Rama Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘रमा राघव’ सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरु आहे. मालिकेला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. असे असताना मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे. हि अभिनेत्री कोण आहे..? आणि तिने अशी अचानक एक्झिट का घेतली..? याविषयी तिने स्वतःहून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली … Read more

सिंधुताईंच्या प्रेरणेतून मालिकेच्या टीमने महाराष्ट्रातील 5 शहरांत केले विद्यादान

Sindhutai Mazi Mai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सिंधुताई माझी माई’ या आगामी मालिकेची चर्चा आहे. लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून संध्या ७ वाजता ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ ही मालिका प्रसारित … Read more

‘सुंदरा..’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण

Sundara Manamdhye Bharali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिका निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. यातील काही मालिका तर ऐन प्रसिद्धीच्या झोतात असताना निंरोपाकडे मार्गस्थ झाल्या आहेत. तर काही मालिका केवळ टीआरपी मिळत नसल्यामुळे मेकर्सला बंद कराव्या लागत आहेत. यांमध्ये आता कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचाही समावेश झाला आहे. मराठी मालिका विश्वातील हि … Read more

‘फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर..’; ‘सिंधुताई माझी माई..’ मालिकेत किरण माने दिसणार ‘या’ महत्वाच्या भूमिकेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. विषयातील वैविध्य आणि संवेदनशील कथानक हे या मालिकांचे वैशिष्ट्य आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि मालिका सुरु होतेय. या मालिकेत अभिनेता किरण माने हे सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या भूमिकेविषयी … Read more

पुन्हा राडा होणार.. पुन्हा चावडी भरणार!! BIGG BOSS मराठी सीजन 5 येतोय; जाणून घ्या कधी..?

Bigg Boss Marathi 5

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर अनेक मालिका लोकप्रिय आहेत. मात्र छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. हिंदी बिग बॉसनंतर मराठीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हढ्याच ताकदीने तो प्रेक्षकांना भावला. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे एकूण चार सीजन झाले आहेत. यातील प्रत्येक सीजन कमालीचा गाजला. त्यामुळे आता बिग बॉस … Read more

‘सिंधुताई.. माझी माई’; कलर्स मराठीच्या नव्या मालिकेतून उलघडणार ‘गोष्ट चिंधीची’

Sindhutai Mazi Maai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वात अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जीवनगाथा, यशोगाथा आपल्याला पहायला मिळतात. यांमध्ये आता दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याही चिंधीची गोष्ट छोट्या पडद्यावर उलगडणार आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी या लोकप्रिय वाहिनीवर माईंची चरित्रकथा आपल्याला पाहता येणार आहे. यामुळे माईंना अतिशय जवळून जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची एक संधी … Read more

‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या सेटवर दैवी चमत्काराची अनुभूती; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Balumamachya Navane Changbhal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ हि अध्यात्मिक मालिका सुरु आहे. या मालिकेतून संत बाळूमामा यांच्या अलौकिक कथांचे कथन केले जात आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. अशातच नुकताच मालिकेच्या सेटवर कलाकरांना दैवी चमत्काराची अनुभूती आली आहे. याचा व्हिडीओ मालिकेत बाळुमामांची भुमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याने आपल्या अधिकृत सोशल … Read more

रितेश देशमुखमुळे पूर्ण झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न; काय आणि कसं..? ते जाणून घ्या

Riteish Deshmukh_ Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्यरत आहे. त्याचं फॅनफॉलोईंग देखील जबरदस्त आहे. रितेश केवळ अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या संस्कारांमुळेदेखील ओळखला जातो. नुकतीच मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी रितेश देशमुखचे आभार मानले आहेत. या … Read more