मी रडलो नाहीये अजून!! आस्ताद काळेला मातृशोक; शेअर केली भावूक पोस्ट

Astad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आस्ताद काळेने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतीच आस्ताद काळेबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. आस्ताद काळेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आईचे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. काही दिवसांपुर्वीच आस्तादच्या आईचे निधन झाले आणि आईच्या आठवणीत अभिनेता भावुक … Read more

शाहीर दीनानाथ साठे- वाटेगांवकर काळाच्या पडद्याआड

Shahir Dinanath Sathe Vategaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच मराठी सिनेसृष्टीला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील असणारे शाहीर दिनानाथ साठे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, चार मुली आणि नातवंड असा परिवार आहे. काही काळापूर्वी दीनानाथ साठे … Read more

हार्दिक जोशीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; भावुक होत म्हणाला, ‘तू आज आमच्यात नाहीयेस पण…’

Hardeek joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता हार्दिक जोशी हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्याने साकारलेला राणा दा त्याला प्रेक्षकांच्या जवळ घेऊन आला. सध्या हार्दिक त्याच्या आगामी कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. लवकरच झी मराठीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. ज्याचे सूत्रसंचालन हार्दिक जोशी करणार आहे. एकीकडे नव्या कार्यक्रमाचा … Read more

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन; राहत्या घरीच घेतला अखेरचा श्वास

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिची आई आजारी होती आणि याच आजारपणात त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे. … Read more

‘आई गेल्याने कुटुंबात…’; सीमा देव यांच्या निधनावर मुलांची भावनिक प्रतिक्रिया

Deo Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत मराठी अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सीमा देव यांचे आज २४ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. या दुःखद बातमीने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८१’व्या वर्षी सीमा देव यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ७ वाजता त्यांचं बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचे सुपूत्र अभिनय देव यांनी … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; गंभीर आजराने होत्या त्रस्त

Seema Deo

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी गंभीर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेता अजिंक्य देव यांच्या आई होत्या. अनेक … Read more

‘तू असशील.. आणि आहेस’; आईच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Chaya Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छाया कदम हे मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले नाव आहे. मराठीचं नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमा तसेच विविध आशयाच्या सिरीजमध्ये छाया यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. छाया कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. छाया कदम यांच्या … Read more

‘माझ्या आयुष्यात ज्यांनी ”अजिंठा” आणला…’; देसाईंनंतर महानोर यांच्या निधनाने सोनाली झाली भावुक

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि युवा वृत्ताने सिनेविश्व शोकसागरात बुडाले. या धक्क्यातून अद्याप सिनेसृष्टी उभारलेली नसताना आज ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांच्या निधनाचे वृत्त सकाळी समोर आले. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून … Read more

नितीन देसाईंच्या पार्थिवावर एन. डी. स्टुडिओत अंत्यसंस्कार होणार; निकटवर्तीयांची माहिती

Nitin Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत एन.डी. स्टुडीमध्ये आढळून आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. देसाईंनी कर्जत येथील स्वतःच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. नितीन देसाईंनी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय..? हे अजूनही समोर आलेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, कर्जबाजारीपणा … Read more

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन; पुण्यातील रुग्णालयात सुरु होते उपचार

Poet Namdev Dhondo Mahanor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाईं यांच्या आत्महत्येच्या मृत्यूने कलाविश्व हादरले. यानंतर आज प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा शबद घेतल्याचे समजत आहे. दरम्यान ते ८१ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, कवी ना. धों. महानोर हे गेल्या काही दिवसांपासुन किडनीच्या … Read more

‘दादांची एक्झिट चटका लावणारी..’; नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी शोकाकुल

Nitin Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा अशा पद्धतीने निरोप घेतला की त्यांची एक्झिट प्रत्येकाला चटका लावून गेली. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच मनोरंजन विश्वात … Read more

शिंदेशाहीचा एक सूर हरपला; प्रल्हाद शिंदेंच्या नातवाचे हार्ट अटॅकने निधन

Sarthak Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सकाळी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. यानंतर संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली. अशातच संगीत कला विश्वातूनही अत्यंत दुःखद वार्ता समजत आहे. शिंदेशाही घराण्यातील एक सूर हरपल्याचे हे वृत्त आहे. आनंद शिंदे यांचे बंधू दिनकर शिंदे यांचा मुलगा सार्थक शिंदे याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रल्हाद … Read more

मराठी साहित्य क्षेत्राला मोठा धक्का! लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; कणेकरी आवाज हरपला

Shirish Kanekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती खालवल्यामुळे गिरीश कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि कणेकरी आवाज हरपला. शिरीष कणेकर हे एक निर्भीड पत्रकार असून ते सिनेमा, क्रिकेट, साहित्य आणि राजकारण … Read more

अखेरचा निरोप!! मराठी कलाकारांनी साश्रू नयनांनी घेतले जयंत सावरकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

Jayant Savarkar Last Rites

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे काल सोमवारी, २४ जुलै २०२३ रोजी निधन झाले. या बातमीने संपूर्ण सिने विश्वावर शोककळा पसरली. चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, वेब सिरीज यांसारख्या विविध माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते मनोरंजन विश्वात कार्यरत होते. … Read more

अण्णा गेले!! ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jayant Sawarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. या बातमीने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेते जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर याने दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागच्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातल्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, रविवारी त्यांची … Read more