‘गोविंदा आला रे आला…’; पुण्यातील भव्य दहीहंडीच्या जल्लोषात ‘हे’ कलाकार घेणार सहभाग

Dahihandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात कृष्णप्रेमी आणि भक्त गोकुळ अष्टमी साजरी करत आहेत. तर उद्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने लहान मोठे गोपाळ उंचावरील हंडी फोडताना दिसतील. ठिकठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध मंडळ, ट्रस्ट, राजकीय नेतेमंडळी मोठमोठ्या बक्षिसांच्या दही हंडी उभारतात आणि हे बालगोपाल श्रीकृष्णासारखे हंडी फोडतात. दरवर्षीप्रमाणे पुण्यात यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि … Read more

प्रशांत दामले यांना मातृशोक; वयाच्या 92’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prashant Damle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट आणि नाटक क्षेत्रात सक्रिय असलेले लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध कलावंत प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीत माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल … Read more

प्रवीण तरडेंनी कुटुंबासोबत अनुभवला सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम; म्हणाले, ‘शेवटी डोळ्यात पाणी आलंच..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वीर पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक, चाहते, समीक्षकी यांसह अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. … Read more

पिच्चर आल्यावर काय हुईल..? शाहरुखच्या ‘जवान’साठी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, ‘लै आतुरतेने वाट बघतोय..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचीज उत्सुकता वाढवली आहे. विशेष करून शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शाहरुख चाहत्यांबद्दल बोलायचं तर यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा या चित्रपटाची चर्चा सुरु असताना मराठी अभिनेता किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट … Read more

‘माझं बॅगेज 4 दिवसांपासून गायब..’; प्रसिद्ध एअर लाईन्सच्या बेजबाबदार सर्व्हिसचा अभिनेत्याला मनस्ताप

Aniket Vishwasrao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावने विविध चित्रपटांमधून कायम वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कित्येक भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पोश्टर बॉईज’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अनिकेतने अव्वल भूमिका साकारल्या आहेत. केवळ चित्रपट नव्हे तर मालिका आणि नाटकांमध्येही त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं आहे. दरम्यान अनिकेतने … Read more

‘भारतात मुस्लिम आहेत म्हणुन तुम्ही हिंदू…’; किरण मानेंची खाड्कन जागं करणारी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेला हा चेहरा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय विविध विषयांवर परखड बोलण्याच्या सवयीमुळे ते कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर … Read more

‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी…’; मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करताना ते कायम स्वतःचे अनुभव, किस्से शेअर करत असतात. मिलिंद गवळी यांनी आतापर्यंत चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अस्खलित अभिनयाने कायम प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अलीकडेच मालिकेत लेकीच्या लग्नावेळी अनिरुद्ध साकारताना पुन्हा एकदा मिलिंद गवळी यांनी … Read more

‘पुन्हा एकदा तोच प्रवास…’; वडिलांच्या मृत्यूनंतर गश्मीर ऐतिहासिक भूमिकेतून करणार कमबॅक

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ जुलै २०२३ हा दिवस संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला हादरा देणारा दिवस ठरला. या दिवशी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अकस्मात निधनाच्या बातमीने मोठा धक्का दिला. रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याला आपल्या वडिलांच्या निधनाची कल्पना नसल्याचे समोर आल्यानंतर टीकांचा तीव्र मारा त्याला सहन करावा लागला. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या … Read more

सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!! मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी अभिनेत्याचा संताप; ट्विट झालं व्हायरल

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार मंडळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. केवळ सक्रिय नव्हे तर ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात … Read more

‘1 लाख 22 हजार 640 तास, 5110 दिवस आणि 14 वर्ष…’; जितेंद्र जोशीची सहचारिणीसाठी खास पोस्ट

Jitendra joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जितेंद्र जोशी हा मराठी कला विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा विविध मनोरंजन क्षेत्रात त्याने नेहमी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. याशिवाय जितेंद्र एक उत्तम कवीदेखील आहे. अत्यंत मार्मिक पद्धतीने एखाद्या विषयाची अगदी सहज मांडणी करण्यात जितेंद्रचा हातखंडा आहे. त्यामुळे प्रत्येक माध्यमात … Read more

‘वडिलांच्या भूमिकेत किरण मानेचं हवेत..’; छोट्या सिंधुताई साकारणाऱ्या अनन्याने केली होती देवाकडे प्रार्थना

Kiran Mane_Ananya Tekwade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ नंतर किरण माने आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झालेल्या ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ या कार्यक्रमात किरण माने हे अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंचे वडील … Read more

नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘कसलं भारी …’

Aishwarya Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या मनात वसल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. हे नारकर जोडपं वयाची पन्नाशी ओलांडूनही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. नुसते कार्यरत नाहीत तर अपडेट सुद्धा आहेत. अविनाश आणि ऐश्वर्या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आजकाल या जोडप्याच्या डान्स … Read more

व्हॉट झुमका… भाऊ कदम यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला दिलं खास गिफ्ट

Mamta_ Bhau Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून कायम प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारे अभिनेते भालचंद्र कदम अर्थात सर्वांचे लाडके भाऊ सोशल मीडियावर फार सक्रिय नसतात. तरीदेखील त्यांची हवा मात्र सोशल मीडियावर कायम असते. नुकताच भाऊ आणि त्यांची पत्नी ममता कदम यांनी लग्नाचा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. यानिमित्त भाऊंनी पत्नी ममताला एक … Read more

‘मंगळसूत्रात ओवले काळे मणी…’ सुपर्णा श्यामची थाटात मंगळागौर; उखाण्यातून जिंकलं नवरोबाचं मन

Suparna Sanket

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकले. यांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता संकेत पाठक. त्याने सुपर्णा श्यामसोबत लग्नगाठ बांधली आणि नुकतीच संकेतने बायकोची पहिली मंगळागौर मोठ्या थाटामाटात साजरी केली आहे. या मंगळागौर सोहळ्याचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील … Read more

हास्यजत्रेचा गौऱ्या झळकणार हिंदी सिनेमात; पोस्ट शेअर करत म्हणाला..,

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. यामध्ये अभिनेता गौरव मोरेचा देखील समावेश आहे. उत्तम अभिनय आणि विनोदाचं परफ़ेक्ट टायमिंग यामुळे गौरवला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा’सोबतच तो मराठी चित्रपटातही झळकणार आहे. याशिवाय आता … Read more