सोनाली कुलकर्णीच्या मल्याळम सिनेमातील गाणं रिलीज; अदाकारीने वेधलं साऊथ इंडस्ट्रीचं लक्ष

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात … Read more

केतकी चितळेचा मराठा योद्धा जरांगे पाटलांवर निशाणा; म्हणाली, ‘मुखवटा फार काळ टिकत नाही..’

Ketaki Chitale_Manoj Jarange Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात सर्वत्र जातीय सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. यांपैकी एक महिला कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी काम करत असताना अभिनेत्री केतकी चितळे त्यांच्यासोबत हुज्जत घालताना दिसली. यावेळी तिने आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्यदेखील केली. पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यास जाब विचारताना केतकीने अ‍ॅट्रॉसिटीवरून टोमणा देखील मारला. इतकेच काय तर मी … Read more

शिवानी सुर्वे झाली मिसेस ननावरे!! काल गुपचूप साखरपुडा केला, आज लग्नाचा बार उडवला; पहा व्हिडीओ

Shivani Surve_ Ajinkya Nanaware

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारी २०२४ रोजी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला. सोशल मीडियावर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. यानंतर त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु असताना नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील समोर आले आहेत. अखेर शिवानी अजिंक्यची झाली असून ठाण्यात त्यांचा शाही … Read more

‘ते मंतरलेले 6 महिने…’; अशोक मामांसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत हेमांगी कवीची खास पोस्ट

Ashok Saraf_Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषणा केला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या घोषणनेनंतर सर्व स्तरांवरून अभिनेता अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय मंडळी, कलाकार मंडळी, … Read more

अखेर बंधनात!! शिवानी- अजिंक्यने उरकला गुपचूप साखरपुडा; फोटो शेअर करत दिला आनंदाचा धक्का

Shivani Surve_ Ajinkya Nanaware

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि तिचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अजिंक्य ननावरे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांनी कुणालाही कानोकान खबर न लागत गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते. थेट सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपला साखरपुडा झाल्याची आनंदाची … Read more

‘रोमँटिक पोस्ट.. स्पेशल गिफ्ट..’; स्वानंदने ‘असा’ साजरा केला बायको गौतमीचा वाढदिवस

Gautami Deshpande_Swanand Tendulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचली. गौतमीने गेल्यावर्षी २५ डिसेंबर रोजी प्रियकर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर आज गौतमीचा पहिला वाढदिवस आहे. जो अत्यंत खास आहे. त्यामुळे आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त स्वानंद तेंडुलकरने सोशल मीडियावर … Read more

तेजस्विनी पंडितने पुण्यात सुरु केलं मिडनाईट सलोन; राज ठाकरेंच्या हस्ते केलं ग्रँड ओपनिंग

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी कला क्षेत्राव्यतिरिक्त विविध क्षेत्रात पदार्पण करताना दिसले. कुणी कपड्यांचा व्यवसाय सुरु केला, तर कुणी दागिन्यांचा. अनेक कलाकार हॉटेल व्यवसायात देखील उतरल्याचे पहायला मिळाले. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अभिनेता निरंजन कुलकर्णी, श्रेया बुगडे, अनघा अतुल या कलाकारांनी हॉटेल … Read more

जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार..? मेघा घाडगेंना राग अनावर; म्हणाल्या, ‘जात बघून मैत्री करणारा तू..’

Pushkar Jog_Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात महानगरपालिकेचे कर्मचारी जातीय सर्वेक्षण करताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन माहिती जमा करत आहेत. आपल्याला जात विचारली म्हणून अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी आगपाखड केली होती. दरम्यान, ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर २ लाथा घातल्या असत्या’, असे विधान करून पुष्करने वाद ओढवून घेतला. वाद वाढल्याचे लक्षात येताच त्याने माफी … Read more

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर अक्षता पडणार; मेहंदी- संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल

Ruta Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी नुकतीच लग्नबंधनात अडकली. मुग्धा वैशंपायन- प्रथमेश लघाटे, सुरुची अडारकर- पियुष रानडे, गौतमी देशपांडे- स्वानंद तेंडुलकर , स्वानंदी टिळेकर- आशिष कुलकर्णी या जोडप्यांपाठोपाठ आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हि अभिनेत्री म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत इरा हे पात्र साकारणारी ऋता … Read more

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ मिळताच ज्येष्ठ अभिनेत्रीची खास पोस्ट; जुन्या आठवणींना दिला उजाळा

Ashok Saraf_ Varsha Dandle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि घोषणा केल्यानंतर विविध स्तरांवरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. कलाविश्वात अनेक मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी बोलत आहेत. … Read more

‘पराकोटीचा अट्टहास व तळमळ…’; हिंदी नाटकात पत्नीचा अभिनय पाहून अभिजीत खांडकेकर गेला भारावून

Sukhada_Abhijeet Khandkekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अभिजीत खांडकेकर टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मालिकांमध्ये वेगवेगळी पात्र साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अनेकदा ती पत्नीसोबतचे फोटो देखील … Read more

अधीर मन झाले!! पूजा सावंतला येतेय होणाऱ्या नवऱ्याची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाली..

Pooja Sawant_SiddheshChavhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री पूजा सावंत हि सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’मुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. दरम्यान प्रोफेशनल आयुष्यासोबतचं पर्सनल आयुष्यामुळेही पूजा सावंत चर्चेत आहे. येत्या महिन्यात ती लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर पूजा आणि तिच्या होणाऱ्या … Read more

‘आपलं वर्चस्व मोडीत काढलं..’; किरण मानेंनी अ‍ॅट्रोसिटीचा उल्लेख करत घेतला केतकी चितळेचा समाचार

Ketaki Chitale_KiranMane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात जातीय सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. याबाबत मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप व्यक्त केला होता. जात विचारण्याबद्दल दोघांनीही आक्षेप घेत सोशल मीडिया हँडलवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान पुष्कर जोगने ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’ असं विधान … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची ‘या’ लोकप्रिय मालिकेत वर्णी; साकारतेय महत्वाची भूमिका

Komal Kumbhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्यावर्षी लोकप्रिय मालिकांपैकी ‘सहकुटुंब सहपरिवार’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसत आहेत. मालिकेतील अवनी म्हणजेच साक्षी गांधी ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेत तर सरू म्हणजेच नंदिता पाटकर नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यानंतर आता मालिकेतील … Read more

मराठमोळ्या कलाकाराच्या व्यवसायाची राज ठाकरेंनी घेतली दखल; ‘देवल मिसळ’चे केले कौतुक

Tushar Deval

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार मंडळी कला क्षेत्राशिवाय विविध क्षेत्रात सध्या कार्यरत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अनेकांनी हॉटेल लाईनमध्ये पदार्पण केल्याचे समोर आले आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम एका कलाकाराने त्याच्या पत्नीसह सुरु केलेल्या नव्या व्यवसायाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. नुसती दखल नव्हे तर त्यांनी या … Read more