‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला 2 महिने पूर्ण; केदार शिंदे म्हणाले, ‘सहा लक्ष्मींच्या पावलाने..’

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून स्त्रियांच्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने … Read more

इश्श्य!! मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने लाडक्या नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा; पहा व्हिडीओ

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीचे मोठ्या संख्येने फॉलोवर्स आहेत. झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून त्यांना राणा दा आणि पाठक बाई या भूमिकांमुळे प्रसिद्ध मिळाली. हि रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही तितकीच लोकप्रिय ठरली. लग्नानंतर हार्दिक- अक्षयाची … Read more

BB मराठी फेम मेघा धाडेची भाजपात महत्वपूर्ण पदावर नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणाली..

Megha Dhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकार मंडळी कलाविश्वाइतकेच राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी विविध पक्षाशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या पदांचा भार स्वीकारला आहे. नुकताच बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकर याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचे समोर आले. यानंतर आता भाजपाने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची … Read more

मालिकेसाठी काय पण!! सीनसाठी अभिनेत्रीने हातावर ठेवला पेटता कापूर; नेटकरी म्हणाले, ‘बापरे!! किती रिस्क..’

Shweta Mehandale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादा कलाकार आपले काम पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी कायम धडपडत असतो. कामातील खरेपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी हि कलाकार मंडळी काहीही करायला तयार असतात. आजारपणात शूटिंग, पावसात भिजणं, स्टंट करणं, दुखापत होऊनही शूटिंग पूर्ण करणं अशी अनेक उदाहरणे आपण ऐकली वा पाहिली असतील. दरम्यान झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील एका सीनसाठी अभिनेत्रीने … Read more

साखरपुड्यानंतर स्वानंदी- आशिषची पहिलीच रोमँटिक ट्रीप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची अत्यंत गाजलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हि आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत मीनल हे पात्र साकारत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर चांगलीच चर्चेत आली. हळूहळू स्वानंदीच्या चाहता वर्ग वाढू लागला आणि आज तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येत फॉलोवर्स आहेत. अलीकडेच तिने आपल्या रिलेशनशिपबाबत घोषणा केली होती. यानंतर लगेच दोन दिवसांत तिचा … Read more

थकत कशी नाहीस गं तू..? सोनाली कुलकर्णीने सादर केली आईसाठी खास कविता

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध चित्रपटांमधून अव्वल भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. नुकतीच सोनाली कुलकर्णी तिची खास मैत्रीण मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरसोबत ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमात हजर राहिली होती. यावेळी सोनालीने ‘आई’साठी अत्यंत भावनिक … Read more

हार्दिकने पूर्ण केली बायकोच्या पहिल्या मंगळागौरीची हौस; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची रील टू रिअल लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत राहिली. मालिकेनंतर हार्दिक आणि अक्षयाचा जीव खरोखर एकमेकांमध्ये गुंतला. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल देखील झाले. यानंतर आता नुकतीच हार्दिकने आपल्या बायकोची म्हणजेच अक्षयाची मंगळागौर साजरी करण्याची हौस पुरवली … Read more

‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी साकारली ‘ही’ प्रभावशाली भूमिका

Alka Kubal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या भव्य यशानंतर ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट असून यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पहायला मिळतेय. चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भूमिका इतक्या अव्वल वठवल्या आहेत कि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. … Read more

‘तुम्ही मला माफ…’; हेमांगीने वाढदिवसानंतर ‘या’ कारणासाठी मागितली चाहत्यांची माफी

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवीने काल म्हणजेच २६ ऑगस्ट २०२३ रोजी तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते, मित्र मंडळी आणि नेटकरी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. फोटो कोलाज, स्टोरीज, पोस्ट शेअर केलर अनेकांनी हेमांगीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या प्रेमासाठी हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्यावर … Read more

‘मन चिंब पावसाळी…’; मीरा जगन्नाथचं घायाळ करणारं मान्सून फोटोशूट व्हायरल

Mira Jagannath

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या बेधडक अंदाज आणि स्पष्ट वक्तेपणामुळे बिग बॉस मराठी सीजन ३ गाजवणारी मीरा जगन्नाथ प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात असेल. या शोनंतर मीरा अशी काही प्रकाशझोतात आली कि बस्स!! विविध मालिकांमध्ये तिने विविध ढंगाच्या सहाय्यक भूमिका रंगविल्या आहेत. दरम्यान मीरा जगन्नाथ हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्यामुळे ती कायम विविध … Read more

‘समोरच्याला काय खुपतंय यापेक्षा…’; अमृता खानविलकरच्या ‘त्या’ फोटोचे कॅप्शन चर्चेत

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ सौंदर्याच्या जोरावर नव्हे तर अभिनय, नृत्य अशा विविध कलागुणांच्या जोरावर तिने कला सृष्टित स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. अमृताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तिने साकारलेली चंद्रा प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. … Read more

‘आई गेल्याने कुटुंबात…’; सीमा देव यांच्या निधनावर मुलांची भावनिक प्रतिक्रिया

Deo Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत मराठी अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सीमा देव यांचे आज २४ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. या दुःखद बातमीने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८१’व्या वर्षी सीमा देव यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ७ वाजता त्यांचं बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचे सुपूत्र अभिनय देव यांनी … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवली फार्महाऊसची झलक; Video शेअर करत म्हणाली, ‘देवाच्या दयेने…’

Varsha Dandale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सेलिब्रिटी त्यांचं आयुष्य कसं जगतात..? कसे राहतात..? काय खातात..? दैनंदिन आयुष्यात कसे असतात..? याबाबत कायम चाहत्यांना उत्सुकता असते. त्यामुळे हि सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर आपल्या राहणीमानाविषयी अपडेट देत असतात. आपले अनुभव, किस्से, कुटुंब, मित्र आवर्जून चाहत्यांसह शेअर करतात. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळी आपलं घर, फार्महाउस याबद्दल देखील सोशल मीडियावर माहिती देत असतात. … Read more

‘चंद्रयान- 3’च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनेत्रीने व्यक्त केला अभिमान; म्हणाली, ‘कुणीच कल्पना केली नव्हती..’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चंद्रयान ३’ यशस्वी झाल्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर सॉफ्ट लँडिंग केलं आणि इतिहास रचला. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यानंतर भारतीयांचा मोठा जल्लोष सुरु आहे. जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; गंभीर आजराने होत्या त्रस्त

Seema Deo

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी गंभीर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेता अजिंक्य देव यांच्या आई होत्या. अनेक … Read more