‘पंचक’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. … Read more

रितेश- जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण; अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर करत भावना केल्या व्यक्त

Ved

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख. रितेश- जिनिलिया कायम त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. आज ३० डिसेंबर २०२३ आणि आजचा दिवस या दोघांसाठी फार खास आहे. कारण रितेश आणि जिनिलियाच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ चित्रपटाने आज १ वर्ष पूर्ण केले आहे. गेल्या … Read more

‘हिंसक पुरूष पात्रांच्या काळात…’; ‘झिम्मा 2’च्या पात्रांविषयी बोलताना हेमंतने साधला ‘अ‍ॅनिमल’वर निशाणा..?

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा सिनेमा या वर्षातील बॉक्स ऑफिस गाजवणारा एक सिनेमा ठरला. थिएटरमध्ये रणबीर कपूरचा बिग बजेट ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा रिलीज होऊनही ‘झिम्मा २’ने मात्र तग धरली. यासाठी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. अशातच हेमंत ढोमेने ‘झिम्मा २’ संबंधी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टमधून त्याने गुपचूक … Read more

स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘Y’ चित्रपट येतोय टीव्हीवर; जाणून घ्या कधी..? कुठे..? पाहता येणार

Y Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका स्त्रीसाठी आई होणं ही जगातील सर्वोत्तम बाब असते. तिच्या आयुष्यातील हे असं सुख आहे ज्या सुखावर तिचा पूर्ण हक्क आहे. स्त्रीच्या गर्भात वाढणारं मुलं स्वतः मोठं होत असताना तिच्यातलं आईपण जागवत असतं. त्यामुळे आई आणि मुलाची नाळ कायम घट्ट असते. आपल्या देशात ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ … Read more

9 व्या AIFF मध्ये ‘भारतीय सिनेमा स्पर्धा’ विभागाचा समावेश; जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन

AIFF

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ३ ते रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर … Read more

बाईपणाची डेफिनेशन मोडून काढणारा ‘झिम्मा 2’; मनाला भावुक करणारा नवा ट्रेलर व्हायरल

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा चित्रपट चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करतोय. आजही या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा एक अत्यंत भावनिक असा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाला भावुक करणाऱ्या या … Read more

‘स्ट्रगल इथले संपत नाही..’; ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या रिलीजदिवशी प्रसादच्या पोस्टने वेधलं लक्ष

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याची खंत प्रसादने व्यक्त केली होती. याबाबत विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा परिषदेत मांडला आणि यावर आता प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करत त्याने दरेकरांचे … Read more

बॉलिवूडकरांवर भारी पडलं बायकांचं रियुनियन; ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ला ‘झिम्मा 2’ची तगडी टक्कर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमा विरुद्ध मराठी सिनेमा अशी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ आणि अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ असे २ तगडी स्टारकास्ट, बिग बजेट सिनेमे रिलीज झाले आहेत. तर या दोन सिनेमांना अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलीच टक्कर … Read more

‘6 पानांचा अन् सलग 6 मिनिटांचा सीन..’; ऑनस्क्रीन सासू सुनेच्या ‘त्या’ सीनबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस तुफान गाजवला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे. ‘झिम्मा २’मध्ये अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील मुख्य भूमिकेत आहे. … Read more

‘हिंदी सिनेमाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट Housefull..’; सुबोध भावेची Insta स्टोरी व्हायरल

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफीसवर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये चांगली चुरस पहायला मिळते आहे. एकीकडे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा सिनेमा तगडी टक्कर देतोय. हे दोन्ही सिनेमी तुफान कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा मराठी चित्रपट बॉक्स … Read more

‘माझ्या आयुष्यात एकाही पुरुषाचा प्रभाव नव्हता’; ‘झिम्मा 2’मधील भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थने केला खुलासा

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील बायकांचं रियुनियन प्रेक्षकांना भारी आवडलं. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री झळकल्या. या गुणी अभिनेत्रींसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने देखील अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे नाव ‘कबीर’ असून यानेच चित्रपटातील या … Read more

‘स्त्रीला स्वत:चं मूल नाही म्हणजे तिचा जन्मच वाया..’; ‘झिम्मा 2’च्या कथेबाबत दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. अजूनही थिएटरमध्ये हा आनंदाचा खेळ रंगतोय. ‘झिम्मा’च्या दुसऱ्या भागात या बायकांच्या रियुनियनची एक सुंदर भावस्पर्शी प्रसंगांसह दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय. यामध्ये दुसरं … Read more

काय कमाल आहे ना बायकांची..? ‘झिम्मा 2’च्या लेडी गँगसाठी सिद्धार्थ चांदेकरची स्पेशल पोस्ट

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळे थिएटर अगदी झिम्मामय झाले आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अगदी धुमाकूळ घालतो आहे. २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकचं नव्हे तर समीक्षकांचेही प्रेम मिळवले आहे. चित्रपटातील सात बायकांच्या रियुनियनची ही हृदयस्पर्शी गोष्ट सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान या चित्रपटातील त्या सात अभिनेत्रींसाठी त्यांच्याबरोबर … Read more

भालचंद्र नेमाडेंची कादंबरी ‘कोसला’ झळकणार रुपेरी पडद्यावर; नव्या चित्रपटाची घोषणा

Kosala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे … Read more

थिएटरमध्ये रंगला आनंदाचा खेळ!! ‘झिम्मा 2’ चित्रपटाची सुपरहिट इनिंग; 5 कोटींचा आकडा पार

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट अलीकडेच २४ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाच्या यशाची उजवी बाजू ठरली आहे. या चित्रपटाने केवळ ४ दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर ५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्याच विकेंडला ‘झिम्मा २’ चित्रपटाने ४.७७ … Read more