म्यूझिक मंत्रने ‘असा’ साजरा केला ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त यांचा 92 वा वाढदिवस; पहा फोटो

Vetaran Film Director Raj Dutt

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूझिक मंत्रने गप्पा गोष्टी आणि राजदत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा घेत, एका आगळया वेगळया पद्धतीने त्यांचा जन्मदिवस राजदत्त यांच्या नातेवाईक व मित्र- परिवारासोबत साजरा केला. या कार्यक्रमात म्यूझिक मंत्रच्या संचालिका डॉ. स्मिता डोंगरे यांनी … Read more

पूजा सावंतसाठी मराठी दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाले, ‘आज स्वातंत्र्यातला तुझा शेवटचा दिवस..’

Pooja Sawant_ Chandrakant Kanse

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा आज वाढदिवस. यानिमित्त सोशल मीडियावर अनेक चाहते तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मात्र यामध्ये पूजाच्या मित्र मंडळींपैकी एका व्यक्तीची पोस्ट फारच व्हायरल होते आहे. हि व्यक्ती म्हणजे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे. मैत्रीण पूजाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट … Read more

प्रसिद्ध मॅगझीनने छापला केदार शिंदेंवर लेख; पत्नी बेला भावुक होत म्हणाल्या, ’27 वर्षे त्याची धडपड..’

Bela Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे आघाडीचे दिग्दर्शक आहेत. आजपर्यंत त्याने मराठी कलाविश्वाला एकापेक्षा एक सरस कलाकृती दिल्या आहेत. ‘अग्गंबाई अरेच्छा’, ‘जत्रा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांनी तर इतिहास घडवला. केवळ चित्रपट नव्हे तर नाटक, मालिका आणि लोककलेच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन सृष्टीत पाय रोवले. यशासोबत अनेकदा अपयश देखील त्यांच्या … Read more

9 व्या AIFF चा समारोप!! आशुतोष गोवारीकरांनी साधला उपस्थितांशी संवाद; म्हणाले, ‘हा माझ्यासाठी मास्टर क्लास..’

AIFF

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र, इथे विभागीय चित्रपटांसह जागतिक चित्रपट पाहायला मिळत आहेत. मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनू शकेल, जिथे चित्रपट येतील आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहचतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या … Read more

‘मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई…’; पत्नीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट

Bela_ Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘जत्रा’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचा दर्जा काही औरच आहे. आज केदार शिंदे हे नाव यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असले तरीही इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत फार मोठी आहे. त्यांच्या पडत्या काळात … Read more

’14 वर्ष वनवासाची…’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट व्हायरल; बायकांवरील विनोदावर केले भाष्य

Angha Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अशातच काल ९ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. जी प्रचंड व्हायरल झाली. पण विजू मानेंच्या पोस्टपेक्षा … Read more

हिच्या बरोबर कसं जगणार..? बायकोच्या फोटोसोबत विजू मानेंनी शेअर केलेलं ‘ते’ कॅप्शन चर्चेत

Viju mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनुभव, किस्से आणि वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत येत असतात. आज विजू माने यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजू माने यांनी पत्नी अनघा माने यांचा फोटो शेअर केला आहे. … Read more

‘ज्युबिली’ वेबसिरीजची कथा चोरीची..? कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवत मराठी लेखकाकडून मोठा आरोप

Jubilee

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंदोलन फिल्म्स, फॅंटम स्टुडिओ आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित, विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘ज्युबिली’ ही वेबसीरिज ३ एप्रिल २०२३ रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता एका मराठी दिग्दर्शकाने या सिरीजची कथा आपली असल्याचा दावा करत सीरिजच्या निर्मात्यांवर कथा … Read more

‘माझ्या घरात मी बॉस पण..’; लग्नाच्या 25’व्या वाढदिवशी रवी जाधवांची खास पोस्ट, शेअर केले Unseen फोटो

Ravi Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी आजतागायत अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘टाईमपास’ ते ‘ताली’ अशा प्रत्येक कलाकृतीत त्यांनी स्वतःची अनोखी छाप सोडली आहे. यामुळे दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत नेहमीच आतुर असतो. रवी जाधव सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या … Read more

‘मी सेलिब्रिटी आहे यार, माझ्या ह्या ह्या अटी आहेत..’; कलाकारांच्या अवास्तव मागण्यांमुळे आयोजक त्रस्त

Bollywood_Marathi Celebrity

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेक सेलिब्रिटी विविध कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेताना दिसतात. यामध्ये अगदी डान्स इव्हेन्ट, शॉप ओपनिंग, लग्न, वाढदिवस आणि अजून बरेच खास प्रसंग सेलिब्रिटी मंडळींसाठी उत्पन्नाचे अन्य एक माध्यम ठरले आहेत. दरम्यान गेली अनेक वर्ष मराठी सिनेविश्वात फोटोग्राफर म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नील रास्ते यांनी सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यामातून एक पोस्ट शेअर करत कलाकारांच्या अवास्तव … Read more

सीएम शिंदेंनी घेतलं मानेंच्या बाप्पाचं दर्शन; दिग्दर्शकाने म्हटलं, ‘ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं…’

Viju Mane_CM Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ‘पांडू’, ‘गोजिरी’ सारखे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिलेत. त्यांची ‘स्ट्रगलर साला’ हि सिरीज तुफान लोकप्रिय आहे. गणेशोत्सवानिमित्त विजू यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. यानिमित्त त्यांच्या घरी अनेक कलाकार मंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यंदाही मानेंच्या घरी बाप्पाचे आगमन … Read more

रवी जाधवांनी यंदाही घडवला इको गणेश; म्हणाले, ‘..जय्यत तयारी सुरु आहे’

Ravi Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आता काही दिवसांतच बाप्पा येईल आणि उत्साहाचा जल्लोष साजरा केला जाईल. दरवर्षी सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान होतो. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही इको गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे … Read more

‘कुठेतरी थांबायला हवं…’ म्हणत केदार शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक दमदार आणि दर्जेदार कलाकृती देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. या वर्षभरात केदार शिंदे यांनी २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. यातील ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केदार शिंदेंचे आजोबा आणि लोकशाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित होता. तर … Read more

माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं..? केदार शिंदेंनी व्यक्त केले मनातील शल्य

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून केदार शिंदेंची ख्याती आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा त्यांचे आजोबा शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटातून शाहिरांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर उलघडण्यात आली आहे. आज शाहीर साबळे यांचा जन्मदिवस आणि या … Read more

सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!! मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी अभिनेत्याचा संताप; ट्विट झालं व्हायरल

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार मंडळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. केवळ सक्रिय नव्हे तर ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात … Read more