नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु; सोशल मीडियावर मुहूर्ताचे फोटो व्हायरल

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर भक्कम स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नाना पाटेकर हे अभिनय विश्वातील विद्यापीठ असे म्हटले जाते. नाना पाटेकरांनी आजपर्यंत नायक, खलनायक, विनोदी अशा विविध जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नानांच्या आगामी सिनेमाबाबत कायम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. अशातच नाना … Read more

जरांगेंच्या उपोषणाबद्दल हेमंत ढोमेचे ट्विट; म्हणाला, ‘.. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे’

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली असून राज्यभरातून मराठा आंदोलकांनी आवाज उठवला आहे. सत्त्ताधारी चर्चा करण्यासाठी येत नाहीत हे पाहून मराठी आंदोलक आता आक्रमक होऊ लागले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं … Read more

जरांगेंच्या उपोषणासंदर्भात रितेश देशमुखचं ट्वीट; म्हणाला, ‘मराठा समाजातल्या मागास…’

Riteish_Jarange

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीने प्रचंड जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील हे याच मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुले राज्यभरातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या … Read more

ही तीच वाघनखं आहेत..? आस्ताद काळेने उपस्थित केली शंका; मागितला ठोस पुरावा

Astad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उभ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं आणि भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दरम्यान हि वाघनखे ब्रिटन येथून भारतात आणण्यासाठीचा सामंजस्य करार यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा त्यांच्या निवासस्थानी पर्णकुटी येथे … Read more

सत्तेत कोणी का बसेना..!! टोल धाडीवर जाब विचारणाऱ्या तेजस्विनीच्या सोशल हॅण्डलवर कारवाई; संतापून म्हणाली..,

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम व्यक्त होत असते. अलीकडेच सोमवारी तिने टोलबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्या एक्स अकाउंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली. या कारवाईबाबत तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केला आहे. या ट्विटर पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘कोंबडे … Read more

सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!! मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी अभिनेत्याचा संताप; ट्विट झालं व्हायरल

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार मंडळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. केवळ सक्रिय नव्हे तर ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात … Read more

‘अनेक शपथा, अनेक वचनं, गेली अनेक वर्ष ऐकतोय, पण..’; महामार्गाची दुरावस्था पाहून हेमंत ढोमे भडकला

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. विविध पोस्टच्या माध्यमातून तो कधी व्यक्त होतो तर कधी विविध मुद्द्यांना हात घालत परखडपणे टीका करतो. अनेकदा सोशल मीडियावर तो सामाजिक तसेच राजकीय विषयांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाष्य करताना दिसतो. आताही त्याने अशाच एका मुद्द्याला तोंड फोडले आहे. नुकतेच त्याने मुंबई- … Read more

फिल्मसिटीत पुन्हा बिबट्या; मराठी मालिकेच्या सेटवर 200 लोकांचा जीव टांगणीला

Goregaon Filmcity

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपटनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीच्या आसपासचा संपुन परिसर हा जंगलाचा आहे. त्यामुळे अनेकदा विविध मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोंच्या सेटवर वन्य प्राण्यांच्या शिरकावाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. पण गेल्या १० दिवसात आता चौथ्यांदा फिल्मसिटीमध्ये मालिकांच्या सेटवर बिबट्या घुसल्याची बातची समोर आली आहे. नुकताच एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या त्याच्या बछड्यासह घुसला … Read more

‘मराठी कलासृष्टीची मोठी हानी झाली..’; रवींद्र महाजनींना राजकीय नेतेमंडळींनी वाहिली श्रद्धांजली

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मराठी सिनेविश्वाचा विनोद खन्ना अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या निधन वार्तेने सिनेसृष्टीला हादरा दिला. ‘देवता’, ‘झुंज’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा सुपरहिट चित्रपटांमधून मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायम राज्य करत आलेल्या रविंद्र महाजनी यांचा मृतदेह तळेगाव दाभाडेमधील आंबी येथे राहत्या फ्लॅटमध्ये आढळला. या घटनेने सर्वत्र खळबळ … Read more

.. महाराष्ट्रावर अपार प्रेम करणाऱ्या माणसानं आता ”राज” करावं! तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Tejaswwini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय. या राजकीय भूकंपाचे कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत पुकारलेले बंड ठरले आहे. नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या घटनेने राज्याच्या राजकारणातील सर्व सूत्रे अचानक फिरली. दरम्यान केवळ अजित पवार नव्हे तर त्यांच्यासोबत इतरही काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काही काळापूर्वी एकनाथ शिंदेंनी … Read more

‘हे शोभतंय..? रामायण आहे कि..’; ‘आदिपुरुष’मध्ये विभीषणाची पत्नी साकारणारी मराठी अभिनेत्री ट्रोल

Trupti Todarmal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पोस्टर, टीझर रिलीज झाल्यापासूनचं ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. मात्र तरीही VFX मूळे काही ना काही चांगलं पहायला मिळेल अशी आशा प्रेक्षकांना होती. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर जो भ्रमनिरास झालाय त्यावरून सिनेमाचं सुरु झालेलं ट्रोलिंग थांबेल असं वाटत नाही. आधी लूक, मग डायलॉग आणि आता एका सीनमुळे हा … Read more