‘तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा..’; ‘धर्मवीर 2’च्या शूटिंग सेटवरील फोटो व्हायरल

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक त्याच्या अभिनयाच्या जोरावर आघाडी पथावर आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनदेखील त्याची चांगलीच हवा आहे. मधल्या काळात प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनित दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिस तुफान गाजवलं. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात प्रसाद ओकने साकारलेले आनंद दिघे तर प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून अजूनही जाईनात. अशातच आता … Read more

‘आता खुर्ची आपलीच हाय..’; बिग बॉस फेम राकेश बापट आणि अक्षय वाघमारे झळकणार एकाच चित्रपटात

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी..’ असा दमदार संवादाने सुरु होणारा या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर फार गाजला. पण नेमकं सत्तेच्या खुर्चीत … Read more

‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच..’; ‘खुर्ची’ चित्रपटाचा रक्तरंजित टिझर प्रदर्शित

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातून राजकारणातील अनेक रंग दाखवण्यात येणार आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मांडलेला बाजार, मारामाऱ्या, खून असं एकंदर कथानक असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी … Read more

‘सिगरेटचा धूर, बिअरचा फेस.. आता खेळ सुरु’; हार्दिक जोशीच्या ‘क्लब 52’ चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश … Read more

‘उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..’; नम्रता संभेरावची लाडका मित्र पश्यासाठी खास पोस्ट

Namrata_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट उद्या शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाची स्टारकास्ट फारच भन्नाट आहे. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ … Read more

Mahaparinirvana – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘महापरिनिर्वाण’ दिनानिमित्त ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट

Mahaparinirvana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Mahaparinirvana) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, ‘महापरिनिर्वाण‘ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या … Read more

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटात दिसणार तगड्या कलाकारांची मांदियाळी; पोस्टर रिलीज

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’ चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला घरात पंचक लागल्याने ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘आता कोणाचा नंबर…?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. डॉक्टर श्रीराम नेने आणि … Read more

‘माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…’; ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त हेमांगीने शेअर केलं खास गाणं

hemangi kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या ६ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी लाखो अनुयायी एकवटताना दिसणार आहेत. अशातच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या चित्रपटातील एक गाणं शेअर केलं आहे. या गाण्याचे शब्द आणि संगीत हे आंबेडकरांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. … Read more

प्रेक्षकांची हसवणूक करायला ‘पिल्लू बॅचलर’ सज्ज; ट्रेलर पाहिलात का..?

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करायला आता सज्ज झाला आहे. पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘पिल्लू बॅचलर’ या चित्रपटाचा … Read more

आता कोणाचो नंबर..? ‘पंचक’ लावणार भीतीच्या भावनेला विनोदाची झालर; टिझर प्रदर्शित

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला ‘पंचक’ असे म्हटले जाते. ज्यामध्ये शुभ- अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारलेला ‘पंचक’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणारा असा कौटुंबिक चित्रपट आहे. येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, … Read more

भरत जाधव देणार मनोरंजनाचा झणझणीत झटका; तर्रीदार ‘लंडन मिसळ’चा ट्रेलर प्रदर्शित

London Misal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट चर्चेत आहे. एक अनोखं नाव आणि एक भन्नाट गोष्ट घेऊन चटपटीत मनोरंजन करायला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता भरत … Read more

‘… काही आनंद दिघे असतात’; ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांची पसंती

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘धर्मवीर २’ हा चित्रपट येऊ घातला आहे. नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचे टायटल पोस्टर रिलीज करण्यात आले. सोशल मीडियावर हा टिझर व्हिडीओ व्हायरल होत असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. दरम्यान मुहूर्त पूजेनंतर … Read more

उंच आकाशात उडायचं असेल तर हवी मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या वर्षी ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त ठाण्यात संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ तसेच … Read more

‘बनवायची होती लव्हस्टोरी पण गडबड झाली थोडी…’; ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचा भन्नाट टीझर पहाचं

Ek Don Teen Char

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असताना नुकताच आगामी चित्रपट ‘एक दोन तीन चार’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २’नंतर आता ‘एक … Read more