‘त्याच्या चरणापाशी पोहोचले आणि..’; लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन सुखावली अभिनेत्री

Vidisha Mhaskar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने निरोप घेतला. यानंतर मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुलने हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्याचे जाहीर केले. यानंतर आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. या मालिकेत आयेशा हे निगेटिव्ह पात्र साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजेच विदिशा म्हसकर. ती सध्या ‘झी मराठी’च्या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. … Read more

अभिनेता श्रेयस तळपदे घरगुती बाप्पाचे विसर्जन करत नाही; ‘हे’ आहे कारण.. जाणून घ्या

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळी आणि नेते मंडळींचा देखील समावेश आहे. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले हाये. ज्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून पहायला मिळत आहे. मराठी तसेच बिवलीवूड विश्वात नावलौकिक मिळवलेला अभिनेता श्रेयस तळपदेच्या … Read more

‘बॉईज 4’ करणार चौपट धमाका; भन्नाट टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. … Read more

‘… आणि स्वामी बोलावून घेतात’; अमृता खानविलकरने सांगितला दैवी कृपेचा अनुभव

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयात अमृता जितकी उत्तम आहे तितकीच उत्तम ती नृत्यात देखील आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून अमृताने जेव्हढं नाव कमावलं आहे तितकीच लोकप्रियता तिने एक नृत्यांगना म्हणून देखील मिळवली आहे. सध्या अमृता ‘गणराज गजानन’ या नव्या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं … Read more

‘आईने घडवलेली आपल्या बाप्पाची मूर्ती..’; भूषण प्रधानने साजरा केला इको फ्रेंडली गणेशोत्सव

Bhushan Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीने गदगदून जाणारे वातावरण. दरवर्षी सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीसुद्धा गणेहशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. एखादा सण साजरा करायचा म्हणजे नुसताच उत्साह असून फायदा नाही.. तर सण साजरा करताना सामाजिक भान जपणेदेखील तितकेच महत्वाचे असते. मराठी अभिनेता भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतो. यंदाही प्रधान यांच्या घरी … Read more

अमेयने गणपतीच्या देखाव्यातून पूर्ण केली आई- बाबांची इच्छा; घरीचं घडवलं केदारनाथाचं दर्शन

Amey Wagh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणपती बाप्पा हा सगळ्यांचा लाडका आहे. अनेकांचे आराध्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आला कि सगळेच आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने बाप्पाचे कोडकौतुक करताना दिसतात. या सणादरम्यान अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होतो. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. सेलिब्रिटींनी आपल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केले आहेत. यांपैकी अमेय … Read more

‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता..’; गणेशोत्सवानिमित्त उत्कर्षने शेअर केला प्रल्हाद शिंदेंच्या गायनाचा दुर्मिळ व्हिडीओ

Utkarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. बाप्पाच्या उत्सवाचे हे १० दिवस अत्यंत उत्साहाचे असतात. कुणाच्या घरी, तर कुणाच्या मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र हमखास वाजणारं गाणं म्हणजे ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’. प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील हे गाणं गेल्या पिढ्यांपिढ्या वाजतंय आणि गाजतंय. या गाण्याविषयी आणि गणेशोत्सवाविषयी प्रल्हाद … Read more

‘खूप बटन्स, पायलटची खुर्ची, मॉनिटर…’; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला विमानाच्या केबिनमधला अनुभव

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये अभिनय आणि सूत्रसंचालन, काव्य लेखन यामध्ये पारंगत असलेला संकर्षण कऱ्हाडे हरहुन्नरी कलाकार आहे. आपल्या दमदार शैलीने तो कायम प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम करताना दिसतो. अभिनयासह त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर गुणांमुळे आज मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं आवर्जुन नाव घेतलं जात. शिवाय तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामुळे तो … Read more

बोल बोबडे.. खोल भक्ती..!! प्राजक्ता माळीच्या भाचीला ‘गणपती स्तोत्र’ तोंडपाठ; व्हिडीओ झाला व्हायरल

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि उत्साह पसरला आहे. सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळेच बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. बाप्पाचे आगमन हर्षोल्लास निर्माण करणारे असते. या दिवसात लोक एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह पाहण्याजोगा असतो. अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर … Read more

‘इतकं गोड खाऊ नका…’; चिमुकल्या जीजाने दिल्या लाडक्या बाप्पाला हेल्थ टिप्स

Adinath_Jija

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच बाप्पाचं कोड कौतुक करण्यात सध्या बिझी आहेत. राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम एकदम जोरदार सुरु आहे. घरोघरी लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. त्यामुळे घराघरात गोडधोड आणि विशेष करून बाप्पाचे प्रिय मोदक बनत आहेत. मोठ्यांइतकंच लहानांनासुद्धा बाप्पाचं वेड असतं ते काही खोट नाही. ही लहान मुलं बाप्पावर जेव्हढं प्रेम करतात तेव्हढीच … Read more

अभिज्ञाच्या घरी अवतरला स्वामीरुपी बाप्पा; Insta’वर फोटो शेअर करत म्हणाली, ‘अशक्य ही शक्य..’

Abhidnya Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वत्र आनंदी, उत्साही आणि भक्तिपूर्वक वातावरण तयार झाले आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सगळेच आनंदी झाले आहेत. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुल पै यांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे. अभिनेत्रीने … Read more

शुद्ध, सात्विक आणि रुचकर.. ‘वदनी कवळ’; ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचे हॉटेल क्षेत्रात पदार्पण

Anagha Bhagare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वरील नुकतीच निरोप घेतलेली लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मधून खलनायिकेची भुमिका साकारत घरघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा भगरे ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. या मालिकेत तिने श्वेताची भुमिका साकारली होती. अनघा सोशल मीडियावर खुप सक्रिय असते आणि त्यामुळे तिचे फॉलोवर्स खूप आहेत. गणेशोत्सवानिमित्त अनघाने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. … Read more

‘एका महिन्यात मिळालेला दुसरा पुरस्कार..’; सलील कुलकर्णींनी शेअर केली आनंदाची बातमी

Saleel Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ६९’व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये लोकप्रिय गायक, संगीतकार आणि गीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला. याशिवाय सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी एक पुरस्कार मिळाल्याचे सांगत आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. सलील कुलकर्णी यांनी अधिकृत … Read more

स्वानंदीचा ‘मोदक’ झाला ‘मोमो’; अभिनेत्रीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Swanandi Tikekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जो तो बाप्पाच्या भक्तीत दंग झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी देखील त्यांच्या घरगुती बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सारेच जाणतो कि बाप्पाचा मोदक किती प्रिय आहेत. त्यामुळे घराघरात विविध प्रकारचे मोदक बनविले जात … Read more

पिंकीने साधला गणेश चतुर्थीचा मुहूर्त; अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

Sharayu Sonawane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असो’ ही सध्या टीआरपीमध्ये इतर मालिकांना चांगलीच स्पर्धा देते आहे. या मालिकेत पिंकीची मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे लोकप्रिय झाली आहे. दरम्यान शरयूचा चाहता वर्ग चांगलाच वाढत चालला आहे. दरम्यान एकीकडे राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत अभिनेत्री शरयू सोनावणेने … Read more