ज्याला मित्र नाही तो खडूस आणि करंटासुद्धा…; अमेय सांगतोय कशी असते ‘दिल दोस्ती दुनियादारी’

Amey Wagh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच सर्वत्र मैत्री दिन साजरा केला गेला. यानिमित्त बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर मित्र मैत्रिणींसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि धमाल केलेले क्षण शेअर केले. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश होता. या निमित्त ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमातील मध्यवर्ती भूमिकेत असलेली मंडळी आली होती. यावेळी अभिनेता अमेय वाघ याने … Read more

अजीब दास्तां है येsss!! ‘या अशा वागणार आणि…’; सोनालीने शेअर केला सई- प्रार्थनाचा ‘तो’ व्हिडीओ

Saie_Sonalee_Prarthana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अनेक मित्रांच्या जोड्या आपण पाहिल्या असतील. मैत्रीचे उदाहरण देता येईल अशी यांची यारी चित्रपट सृष्टीतील स्पर्धेचा भाग नसल्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. कोणताही द्वेष, राग किंवा वाईट भावना न ठेवता कलाकार मंडळी देखील एकमेकांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण नटे ठेऊ शकतात हे या मित्रांच्या जोड्या पाहिल्या कि आपसूकच स्पष्ट … Read more

आनंदी आनंद..!! स्वानंदी- आशिषचं लग्न कधी होणार..? उदय टिकेकरांनी दिली महत्वाची माहिती

Swanandi_Ashish Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडियासाठी आकर्षण ठरले. आता स्वानंदी आणि आशिष यांचं लग्न कधी होणार…? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून त्याबाबत एक मोठी अपडेट समोर … Read more

‘तू मर बुआ एकदाचा…’; अतुल कुलकर्णींनी सादर केलेली बापूंच्या मृत्यूवर भाष्य करणारी कविता व्हायरल

Atul Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अख्ख जग ज्यांना बापू म्हणून ओळखतं त्या महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्‍तव्‍य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले. या वक्तव्याने सर्व माध्यमांवर दाणदाण उडवली … Read more

‘या’ दिवशी सुरु होणार मुक्ता- सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’; तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. मध्यंतरी तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी मालिकेचा … Read more

बॉलिवूडकरांच्या गर्दीत उठून दिसली मराठमोळी क्षिती; करण जोहरने केलं कौतुक

Kshitee jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा. या चित्रपटात तिची लक्षवेधी व्यक्तिरेखा … Read more

मराठी भाषेचा राजधानीत गौरव होणार; ‘मधुरव- बोरु ते ब्लॉग’चा 25’वा प्रयोग दिल्लीत रंगणार

Madhurav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राजभवन’, ‘गेट वे ऑफ इंडिया’ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये सादर केला गेलेला एकमेव मराठी नाट्य प्रयोग ‘मधुरव- बोरु ते ब्लॉग’ आता थेट दिल्ली येथे सादर होणार असून त्याचे निमित्त ही ख़ास आहे. ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’चा २५’वा (रौप्य महोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे येत्या ३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता होणार असून … Read more

विदर्भातील जंगलाच्या ‘टेरिटरी’ची कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार; पहा पोस्टर

Territory

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने वाघ, बिबट्या यांच्यासारखे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची अशीच थरारक कहाणी १ सप्टेंबरपासून उलगडणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे. जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री … Read more

एक असंही BREAK- Up!! संतोष जुवेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला, ‘तिने माझ्या अंगावर पैसे फेकले..’

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनामनांवर राज्य करणारा अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा विविध लूक, व्हिडीओ, किस्से आणि अनुभव सांगत तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. आजपर्यंत संतोषने चित्रपटात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नेहमीच त्याची काही ना काही कारणांमुळे चर्चा असते. अलीकडेच एका वाहिनीला त्याने मुलाखत … Read more

‘चिपळूण आमचं गाव रे..’; ओंकार भोजनेच्या कवितेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Onkar Bhojane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने प्रेक्षकांना अत्यंत लाडका आहे. हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार ‘फु बाई फु’च्या नव्या पर्वात दिसला. त्यानंतर ओंकार मराठी चित्रपटात देखील झळकला होता. सध्या तो भाऊ कदमसोबत ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. आपण सारेच जाणतो कि, ओंकार भोजने काव्यप्रेमी आहे. त्याच्या … Read more

स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेची घोषणा; तेजश्री प्रधान येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या बऱ्याच काळापासून कला विश्वापासून लांब आहे. झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’मधून तिने साकारलेली जान्हवी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. इतकेच काय तर याच वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तिने शुभ्रा हे पात्र साकारले होते आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू … Read more

दमदार शुक्रवार!! ‘बाईपण भारी देवा’ थिएटरमध्ये मोफत पाहता येणार; कधी आणि कुठे..? लगेच जाणून घ्या

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजतो आहे. दिनांक ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चार आठवडे होऊनही थिएटरमध्ये कल्ला करतोय. या चित्रपटाचं सर्वाधिक क्रेझ महिला वर्गात पहायला मिळालं आहे. ‘बाईपण भारी देवा’ पहायला आजही प्रत्येक शोला थिएटरमध्ये गर्दी होतेय.अनेकदा चित्रपटाची तिकीटंदेखील मिळत नसल्याचे … Read more

‘यज्ञसेनी’ कादंबरीवर आधारित ‘द्रौपदी’ सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Draupadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी रुक्मिणी मैत्रासोबत “द्रौपदी” हा चित्रपट तयार करणार असून बिनोदिनी-एकटी नातीर उपाख्यान, थिएटर लीजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित बंगाली बायोपिक नंतर हा त्यांचा दुसरा मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाभारताची जादुई कथा रुपेरी पडद्यावर … Read more

फिल्मसिटीत पुन्हा बिबट्या; मराठी मालिकेच्या सेटवर 200 लोकांचा जीव टांगणीला

Goregaon Filmcity

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपटनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीच्या आसपासचा संपुन परिसर हा जंगलाचा आहे. त्यामुळे अनेकदा विविध मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोंच्या सेटवर वन्य प्राण्यांच्या शिरकावाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. पण गेल्या १० दिवसात आता चौथ्यांदा फिल्मसिटीमध्ये मालिकांच्या सेटवर बिबट्या घुसल्याची बातची समोर आली आहे. नुकताच एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या त्याच्या बछड्यासह घुसला … Read more

‘स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण..’; मराठी अभिनेत्रीने शेअर केला कोकण प्रवासाचा व्हिडीओ

Gauri Kiran

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभारत पावसाने धुमाकूळ घातला असताना अनेक जण मान्सून ट्रिपचे नियोजन करत आहेत. आता पावसाळा म्हटलं कि, रस्त्यांची दूरवस्था, खड्डे, साचणारे पाणी हे सगळं आलंच. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सर्व विषयांवर गहन चर्चा सुरु आहेत. दरम्यान गणपती जवळ येतायत त्यामुळे आता चाकरमान्यांची कोकणात ये जा वाढणार. अशात पावसाळ्यामुळे कोकणात जायचे … Read more