केतकी माटेगांवकर घेऊन येतेय ॲक्शन, रोमांस अन ड्रामा; ‘अंकुश’मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Ketaki Mategaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले आहे. ज्यातून गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर … Read more

उमेश- प्रियाची ‘जर तर ची गोष्ट’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Jar Tar Chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या … Read more

‘रस्त्यांची, वसाहतींची वाताहत पाहून मन भरुन आलं’; हिमाचलमधील पूरस्थितीवर अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Swati Deval

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या हिमाचल प्रदेश, कुल्लू, मनाली यांसारख्या ठिकाणी अतिवृष्टीमूळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी लोक पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे अनेकांच्या अनेक आठवणी या ठिकाणांशी जोडल्या आहेत. अशाच काही आठवणींसह प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती देवलने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या गाजलेल्या मालिकेत … Read more

‘बायकांचं मन जाणून घेताना कित्येक वेळा…’; केदार शिंदेंची पत्नी आणि लेकीसाठी भावनिक पोस्ट

Kedar Shinde Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर जणू जादू केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने केलेली कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोनेरी दिवस न संपल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून केदार शिंदे चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी एक खास पोस्ट शेअर … Read more

‘पुरुषांनी स्त्री पात्र साकारणं म्हणजे..’; समीर चौघुलेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचा लाडका कॉमिक शो ठरला आहे. या शोमधून अनेक कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले. अभिनय कौशल्य आणि विनोदाचं परफेक्ट टायमिंग या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण … Read more

अभिमानास्पद!! ‘चंद्रयान- 3’चे यशस्वी प्रक्षेपण; मराठी कलाकारांकडून ISRO’च्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव

Marathi Celebs

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो- ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केले. या चंद्रयानाचे प्रक्षेपण हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केल्याचा … Read more

‘मावळ्याच्या धारदार तलवारीचं पातं..’; ‘सुभेदार’ चित्रपटातील मालुसरे कुटुंबाचे प्रकाशचित्र प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्राचे आद्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज इतिहासाचे प्रत्येक पान रुपेरी पडद्यावर उलघडले जात आहे. त्यामद्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांच्या निष्ठावान मावळ्यांच्या यशोगाथा, वीरगाथांचा समावेश आहे. महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि यामध्ये नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचाही समावेश आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे शिवचरित्राच्या महाग्रंथातील … Read more

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या परिक्षणाची जबाबदारी सलील कुलकर्णी आणि वैशाली माडेच्या खांद्यावर

Saregamapa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचे नाव आवर्जून घेतले जाते. या कार्यक्रमाची अनेक पर्व येऊन गेली आणि प्रत्येक पर्वाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गेली अनेक वर्षं हा कार्यक्रम प्रेक्षकांना सुरेल दुनियेत घेऊन जात आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या कार्यक्रमाचे … Read more

मौसम हाय मस्ताना!! उमेश- प्रियाने लुटला पावसात एकत्र भिजण्याचा आनंद; पहा व्हिडीओ

Umesh_ Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट. हे कपल इतकं गोड आहे कि त्यांचा वेगवेगळा वैयक्तिक जितका चाहता वर्ग आहे त्यापेक्षा जास्त मोठा त्यांच्या जोडीचा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर उमेश आणि प्रिया दोघेही सक्रिय असतात आणि अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना ते … Read more

‘अंकुश’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिकाची सिनेविश्वात एंट्री

Ankush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत ‘अंकुश’ या चित्रपटाची निर्मिति झाली असून येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आता लवकरच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. ‘अंकुश’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले हे मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पणासाठी सज्ज … Read more

BIGG BOSS मराठी फेम सई लोकूरने घेतलं बंगळुरुमध्ये नवं घर; गृहप्रवेशाचा व्हिडीओ व्हायरल

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चा ओढून घेणारा रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. या कार्यक्रमाचे आतापर्यंत ४ सीजन झाले आहेत आणि चारही हिट ठरले आहेत. यातील पहिल्या सिजनमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात तिने काम केले आहे. सोशल मीडियावर विविध फोटो, … Read more

‘माझ्यासाठी रखुमाई हो.. मला काम दे’; ज्येष्ठ कलावंताचे रील स्टार कोकण हार्टेड गर्लकडे आर्जव

Ankita Walawalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असणारी अंकीता वालावलकर गेल्या काही महिन्यांपासून फारच चर्चेत आहे. अंकिता रील स्टार असल्यामुळे तिची सोशल मिडीयावर कायम चर्चा असते. अंकीताचे व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. अंकिता केवळ रील स्टार म्हणून नव्हे तर सामाजिक भान जपण्यासाठी देखील चर्चेत असते. नुकताच तिने ज्येष्ठ अभिनेते मनमोहन … Read more

चंद्रकोर.. नथ.. हिरवा चुडा..!! मराठमोळ्या पेहरावात खुललं प्रार्थनाचं सौंदर्य; नेटकरी म्हणाले, ‘स्त्री ही एक कला…’

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध पेहरावातील फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. प्रार्थना मुळातच दिसायला इतकी सुंदर आहे कि तिने एखाद्या पेहरावातील लूक शेअर केला कि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला म्हणून समजाचं. कधी वेस्टर्न तर कधी मराठमोळ्या पेहरावात प्रार्थना … Read more

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेऊ कि बँकेत..? MHJ फेम कलाकाराने केला वाढत्या महागाईचा उपहास

Shramesh Betkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून महागाई पुन्हा एकदा हातपाय पसरताना दिसू लागली आहे. हळूहळू भाज्यांचे दर पुन्हा एकदा आभाळाला भिडले आहेत. दरम्यान भाजी, डाळ, सांबरमध्ये वापरला जाणारा टोमॅटो इतका महाग झालाय कि सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. टोमॅटोचा दर १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका झाल्याने तो खायचा कि नाही असा प्रश्न पडला … Read more

‘पत्नीया कितना भी काजू- बदाम खाये..’; महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Riteish _ Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वात स्वतःची एक वेगळी छाप पाडणारी बहुचर्चित जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले आणि आपल्या संसाराला सुरुवात केली. आज ११ वर्ष होऊनही त्यांच्यातील प्रेम तितकाच ताजं आणि बहरणारं आहे. आजही ते वेळोवेळी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यात … Read more