हे राम!! अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायकासोबत छेडले सूर; नव्या गाण्याला श्रोत्यांची पसंती

He Ram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण आहे. कारण सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची मंदीरात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या साठी अवघी अयोध्या नगरी सजली होती. नुसती अयोध्या नगरी नव्हे तर संपूर्ण देशभरात या स्वप्नपूर्तीचा आनंद आणि उत्साह पहायला मिळतोय. सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले … Read more

‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ; ‘पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत … Read more

सप्तसूर म्युझिकच्या नव्या आयटम सॉन्गमध्ये झळकली गौतमी पाटील; पहा व्हिडीओ

Gautami Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक जॉनरच्या गाण्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो. यामध्ये ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची अवघ्या महाराष्ट्रभर हवा आहे. मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ म्हणत प्रेक्षकांना वेड लावताना दिसते आहे. सप्तसूर म्युझिकच्या या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील … Read more

‘होईन सावली उन्हात घर जरी…’; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे शीर्षकगीत व्हायरल

Lakshmichya Pavlani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक संपले म्हणून त्या मालिका ऑफ एअर गेल्या. तर काही मालिकांचा टीआरपी खाली घसरल्याने त्या मालिका बंद करण्यात आल्या. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका सुरु होताना दिसत आहेत. अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका सुरु झाली असून तिला प्रेक्षकांची चांगली पसंती … Read more

‘तीच मज्जा आहे दुसऱ्या डावात..’; ‘झिम्मा 2’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर. दिवाळीचे औचित्य साधत ‘झिम्मा २’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या वेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक … Read more

मानसी नाईक म्हणतेय, ‘लावा फोन चार्जिंगला..’; ‘लावण्यवती’मधील तिसरी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘गणराया’ आणि ‘करा ऊस मोठा’ या दोन गाण्यांनंतर आता ‘लावा फोन चार्जिंगला’ ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या ‘लावण्यवती’ च्या गाण्यांमध्ये ‘लावा फ़ोन चार्जिंगला’ या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. नुकताच या लावणीचा टीझर प्रदर्शित झाला असून टीझरवर मिळालेला … Read more

प्रेक्षकांना भावला ‘मराठी पोरीं’चा स्वॅग; ‘झिम्मा 2’च्या पहिल्या गाण्याचं सोशल मीडियावर धुमशान

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला … Read more

परदेशात मराठी पोरींचा कल्ला..; ‘झिम्मा 2’मधील नव्या रूपात बाईपण जपणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज, आनंद एल राय प्रस्तुत आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेला चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने ‘झिम्मा’मय वातावरण निर्माण केलय. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे … Read more

परबांची शिवाली.. बनून आली.. ‘मासोळी ठुमकेवालीsss’; पाहून अदा झाले नेटकरी फिदा

Masoli Thumkevali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिवाली परबचे नवेकोरे गाणे नुकतेच प्रदर्शित आले आहे. सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे ‘मासोळी ठुमकेवाली’ हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची केमिस्ट्री पहायला मिळते आहे. ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या … Read more

‘खरा तो एकची धर्म…’; ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे यांचे संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Mahesh Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. चित्रपटातील सेट, कलाकारांचा लूक ते कथा, संवाद आणि सादरीकरण याबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे. दरम्यान ‘श्यामची आई’ चित्रपटात ‘खरा … Read more

Naal 2 Teaser – ‘चैतू’ची खरी आई अबोला सोडणार..? ‘नाळ- भाग 2’चा टिझर पहा

Naal 2 Teaser

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Teaser) नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी छोट्या ‘चैतू’ची खरी आई त्याच्याशी न बोलताच निघून गेल्याचे आपण पाहिले. यानंतर आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला गेला आहे आणि हि पुढची गोष्ट ‘नाळ भाग २‘मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर … Read more

गर गरा ‘भिंगोरीsss’; ‘नाळ- भाग 2’मधील पहिलं वहिलं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

Naal Part 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे यांचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘नाळ’ सुपरहिट चित्रपट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा … Read more

‘बॉईज 4’ मधील नव्या जनरेशनचं नवंकोरं गाणं रिलीज; ऐकणार तो थिरकणार

Ye Na Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॅाईज’ चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॅाईज ४’मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. आता ‘बॅाईज ४’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, … Read more

‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित पार पडला सोहळा

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची … Read more

‘राधा- कृष्ण’ची वेडी प्रीत पुन्हा जगाला समजावणार शाश्वत प्रेमाचा अर्थ; नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Radha Krushna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय संस्कृतीत राधा आणि कृष्णाचं नातं विलक्षण आहे. राधा-कृष्णाच्या या नात्यावर आधारित अनेक चित्रपट, गाणीही तयार झाली आहेत. मात्र जगाला पुुन्हा एकदा प्रेमाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी सप्तसूर म्युझिकनं ‘राधा कृष्ण’ या नव्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली असून अभिनेत्री सुखदा खांडकेकर या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. मंदार आपटे आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सावनी रवींद्र … Read more