Tejashree Pradhan | तेजश्री प्रधानच्या नवीन ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, घराणेशाही आणि सत्तासंघर्षांवर भाष्य करणार सिनेमा


Tejashree Pradhan | प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य भूमिका असणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने तिच्या अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. तिने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. आणि नुकताच तिचा नवीन एक चित्रपट प्रेक्षकांच्या भीतीला येणार आहे. ‘लोकशाही’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना तेजश्रीची एक वेगळी झलक पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलेले आहे.

मकर संक्रांतीच्या औचित्य साधून लोकशाही या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेले आहे. आता या सिनेमाचे पोस्टर पाहून हा चित्रपट कसा असणार आहे. याबद्दल सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमामधून घराणेशाही आणि सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे.

माणसांची पैशाबद्दल असणारी भूक आणि लोभेची धाव सत्तेकडे कशी असते हे देखील दाखवणार आहे. तेजश्री प्रधानसोबत या चित्रपटांमध्ये आपल्याला भार्गवी चिरमुले , अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मोहन आगासे हे दिसणार आहेत. सुशील कुमार अग्रवाल हे या सिनेमाचे निर्माते आहेत त्याचप्रमाणे संजय अमर यांनी लोकशाही या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.

हेही वाचा – ‘काळी साडी, हलव्याचे दागिने अन् पतंग…’; प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने अशी साजरी केली लग्नानंतरची पहिली संक्रांत

हा चित्रपट 9 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तेजश्री प्रधानचा हा नवीन लोकशाही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. अनेकजन तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा देखील देत आहेत.