Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मालिका चित्रपट पाहिला सगळ्यांनाच आवडते. या चित्रपटांसोबतच तेजश्रीची अजून एक गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडते. ते म्हणजे तिचे विचार. अनेक मुलाखतींमध्ये ती अगदी मनमोकळेपणाने तिचे विचार मांडत असते. आणि अनेकांना तिचे ते विचार आवडतात. तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सगळ्यांना आवडत असतो.
सध्या तेजश्री ‘लग्नाची गोष्ट’ या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमध्ये नुकतेच तिचे लग्न झालेले आहे. मालिकेत जरी आनंदाचे वातावरण असले, तरी दुसरीकडे तिच्यावर खूपच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच्या आईचे निधन झालेले आहे. एवढी मोठी कठीण गोष्ट असताना मालिकेमध्ये लग्नाची भूमिका करताना तिला किती कठीण गेले. याबाबत तिने सांगितले त्याचबरोबर इंडस्ट्रीतील लोकांनी तिला कशाप्रकारे सपोर्ट केला हे देखील तिने सांगितले.
हेही वाचा – तेजश्री प्रधानचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार; अभिनेत्रीने शेअर केला डबींग स्टुडिओतील फोटो
माध्यमांना दिलेल्या मुलाखती तेजश्री म्हणाली की, “माझी आई आत्ताच गेली तर दुसरीकडे मालिकेत माझा लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. त्यामुळे काही दिवस चांगले तर काही दिवस वाईट आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवस मी येतोय तसा जगत आहे. हा महिना माझ्यासाठी खूप कठीण होता. पण मला माझ्या सहकलाकारांची खूप मदत होते. सगळेच खूप छान आहेत. मालिकेत माझ्या आईची भूमिका शुभांगी गोखले साकारत आहे. ती प्रचंड सपोर्टिव्ह आहे. आमच्या आई मुलीचे खूप सिन होत असतात. सगळ्यांचीच मला खूप मदत होते इतकंच नाही तर सिनेमाचं शूटही करत होते. त्यातील सहकाऱ्यांनी देखील मला खूप साथ दिली. मी सगळीकडे प्रमोशनला जाऊ शकत नव्हते ते देखील त्यांनी समजून.”
पुढे ती म्हणाली की, “आपण इतके वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. त्यामुळे हे पाहून बरं वाटतं की, ही इंडस्ट्री काय आहे सब झूट की दुनिया असा आपण नेहमी म्हणत असतो. पण मी अभिमानाने सांगू शकते की, नाही इंडस्ट्रीत माणुसकी आहे. ती कुठेतरी कॅमेरात दिसत असते. काम करताना डोकावत असते या महिन्यात तर मी ते खूप अनुभवलं आहे.”
तेजश्रीची प्रेमाची गोष्ट ही मालिका सगळ्यांना खूप आवडत आहे. लवकरच ती लोकशाही या चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर देखील समोर आलेले आहे. यामध्ये तिच्यासोबत मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले हे कलाकार देखील असणार आहेत.