MNS Dipotsav – मनसेच्या दीपोत्सवाला तेजस्विनी पंडितची हजेरी; राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (MNS Dipotsav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनसे या दीपोत्सवाचे आयोजन करते आणि संपूर्ण उद्यानात रोषणाई करते.

MNS Dipotsav

यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं उदघाटन ९ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोबत अभिनेता विकी कौशलदेखील उपस्थित होता. दरवर्षी हा दीपोत्सव पाहण्यासाठी अनेक कलाकार मंडळी शिवतीर्थावर येताना दिसतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडिताने दीपोत्सवाला हजेरी लावल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.

मनसे दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हजेरी लावताना दिसतात. नुकतीच रविवारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित मनसेच्या दीपोत्सवाला हजर राहिली होती. (MNS Dipotsav) यावेळी तिने शिवाजी पार्क उद्यानातील भव्य सजावट आणि तरूणाईचा उत्साह पाहिला. जो पाहून तेजस्विनी अक्षरशः भारावून गेली. यानंतर तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने शिवतीर्थावरील राज ठाकरे यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘दीपोत्सव २०२३… या अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद साहेब!!! हे सगळं तुम्हीच करू जाणे..’. या फोटोत राज ठाकरे पाठमोरे उभे दिसत आहेत. तसेच सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचे पहायला मिळत आहे. केवळ तेजस्विनी पंडित नव्हे तर मराठी विश्वातील (MNS Dipotsav) अन्य अनेक मंडळी, सोशल मीडिया स्टार हे मनसेच्या दीपोत्सवाला हजेरी लावताना दिसले आहेत. दिवाळीच्या येत्या दिवसातही दीपोत्सवाची उत्साह असाच कायम राहील, अशी आशा आहे.