Tejaswini Pandit |मित्रांनो सध्या टेक्नॉलॉजीचे जग आले आहे. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टीसाठी जास्त करतात. याचे सध्याचे एक उदाहरण म्हणजे साऊथ अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हीचा एक डीपी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. युजरने तिचा हा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची घटना समोर आली आहे.
रश्मीकाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
तिच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेकजण चिंता व्यक्त करत आहे . अनेक कलाकारांनी यावर कमेंट करून त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता यावर आपली मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी देखील भाष्य केले आहे.
रश्मिकाचा हा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विट केला आहे. ज्यामध्ये ती आनंदाने उड्या मारत असल्याचे दिसत आहे. परंतु ते खूप विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलेले आहे. परंतु हा व्हिडिओ रश्मिकाचा नाही, तर झारा पटेल नावाच्या एका महिलेचा व्हिडिओ आहे. ज्यावर टेक्नॉलॉजीचा वापर करून रश्मिकाचा चेहरा लावला गेला आहे.
काय म्हणाली तेजस्विनी पंडित | Tejaswini Pandit
आता यावर तेजस्विनी पंडितने कमेंट केली आहे. तिने लिहिले आहे की, “टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जाऊ नये याचे हे उत्तम उदाहरण आहे एआयचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर आयुष्य उध्वस्त होऊ शकतो सतर्क रहा,”असे तिने लिहिले आहे.
सध्या रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यावर अभिनेत्रीने सुद्धा एक ट्विट केले आहे. तिने दिली आहे की, “मला हे शेअर करताना अत्यंत दुःख होत आहे पण ऑनलाईन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओबाबत भाष्य करणे खूप गरजेचे आहे. हा असा व्हिडिओ केवळ माझ्यासाठी नाही तर प्रत्येकासाठी भीतीदायक आहे.” अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहे. आणि ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा असे देखील म्हटले गेले आहे.