‘मुहूर्त ठरला, मंडप सजला, लग्न लागलं आणि..’; तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तेजस्विनीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अलीकडेच तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने मुहूर्त ठरला.. मंडप सजला.. असे म्हटले होते. त्यामुळे काहींना असे वाटू शकते कि तेजस्विनी लग्न करतेय. पण तसं नसून ही पोस्ट तेजस्विनीच्या आगामी चित्रपटातील गाण्यासाठी तिने केली होती.

सध्या तेजस्विनी पंडित हि तिच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या आगामी मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने केले आहे. हा चित्रपट अत्यंत विनोदी असून नुकतेच यातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘अय्यो’ असे या गाण्याचे शीर्षक असून याच गाण्यासाठी तेजस्विनी पंडितने ही पोस्ट शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मुहूर्त ठरला, मंडप सजला.. लग्न लागलं आणि आमचं नवं गाणं पण आलं ”अय्यो..” तुम्ही सगळे येताय ना आमच्या वरातीत नाचायला #एकदायेऊनतरबघा फक्त चित्रपटगृहांत!’

हा चित्रपट अत्यंत विनोदी कथानकावर आधारलेला आहे. या चित्रपटात फुलंब्रीकर कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. हे फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसायात कार्यरत असून त्यांच्या हॉटेलमध्ये ग्राहक यावे याकरता प्रयत्न करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आणि ग्राहक हॉटेलमध्ये येतात. पण तेच ग्राहक एकामागोमाग वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकत जातात. यामुळे हॉटेल चालक फुलंब्रीकरांवर काय प्रसंग ओढवतात आणि यातून प्रेक्षकांना कशी मज्जा येते..? यासाठी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये ‘एकदा येऊन तर बघा’.