हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल. सध्या या मालिकेचा टीआरपी इतर मालिकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. मालिकेच्या कथनकानुसार, सायली- अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्याचे आपण पाहिले. मात्र अलीकडेच सायली गरोदर असल्याचे समोर आले आणि सुभेदार कुटुंबात आनंदी आनंद झाला. कॉन्ट्रॅक्ट मरीज असताना सायली गरोदर कशी राहिली..? असा प्रश्न पडले यावेळी स्वाभाविक ठरले. दरम्यान हा एक कट असल्याचे अर्जुनच्या आधीच लक्षात आले.
प्रिया आणि अस्मिता या दोघींनी मिळून सायलीला सुभेदारांसमोर खोट्यात पाडण्यासाठी हा कट रचला. त्यांनी डॉक्टरांकडून सायलीचे रिपोर्ट बदलून घेतले. शिवाय डॉक्टरांकडून कल्पनाला फोन करून सायली गरोदर असल्याचे सांगायला लावले. पण प्रत्यक्षात सायली गरोदर नव्हतीच. दरम्यान सायलीच्या आरोग्याची तपासणीसाठी सायली-अर्जुन पुन्हा डॉक्टरकडे जातात आणि यावेळी त्यांच्या मागोमाग प्रिया-अस्मितासुद्धा तिकडे पोहोचतात. अर्जुनला अस्मितावर आधीच संशय असतो आणि त्यामुळे तो लक्ष ठेऊन असतो. यावेळी प्रिया- अस्मिता खोट्या रिपोर्ट्सबद्दल बोलत असताना अर्जुन त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्याच्यासमोर सत्य उघड होते.
अस्मिता खोटे रिपोर्ट्स देणाऱ्या नर्सला शोधत असल्याचे अर्जुनला समजते आणि त्यावरून घडल्या प्रकाराचा तो अंदाज लावतो. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर अर्जुन घडलेला प्रकार सायलीला सांगतो. यावर अस्मिता ताईंनी एवढं मोठं नाट्य रचलं..? असा प्रश्न सायली अर्जुनला विचारते. तर अर्जुन तिला सांगतो, ‘फक्त अस्मिता नाही तर या कटात तन्वीसुद्धा (प्रिया) सामील आहे’. आता मालिकेच्या पुढील भागात सायली- अर्जुन हे सत्य घरच्यांसमोर उघड करणार का..? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. हा महाएपिसोड उद्या ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. ज्याची झलक प्रोमोत पहायला मिळाली. यामध्ये सायली कल्पनाला ती गरोदर नसल्याचं सांगताना पहायला मिळाली.