हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिच्या सौंदर्याने कित्येकांना घायाळ करत असते. मानसी एक उत्तम नायिका आणि तितकीच उत्तम नर्तिका आहे. ती नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयासह उत्कृष्ट नृत्य कलेने सर्वांना मोहित करते. शिवाय मानसी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ याशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती चात्यांसोबत शेअर करताना दिसते. आताही तिची अशीच एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली आहे. अलीकडेच तिने पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होते. यानंतर मानसी नाईक ट्रोलदेखील झाली आणि अनेकांनी तिच्या निर्णयाचे स्वागत देखील केले. दरम्यान मानसी नाईक सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या रिल्स आणि इतर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आल्या आहेत. मानसी नेहमीच तिच्या नृत्य कलेचे सादरीकरण रिल्सच्या माध्यमातून करते. पण यावेळी मानसीने शेअर केलेल्या व्हिडिओसोबतचे कॅप्शन जास्त चर्चेचा विषय ठरले आहे. या व्हिडीओमध्ये मानसी नाईकने गुलाबी रंगाची अतिशय साधी साडी परिधान केल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच फार सुंदर दिसतेय. तिने बॉलिवूडमधील ‘तू दिवाना पागल’ या गाण्यावर सुंदर हावभावांसह नाचतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘धन्यवाद विश्व. मी हार मानणार नाही’. यापुढील पोस्टसोबतदेखील तिने असेच कॅप्शन जोडले आहे. त्यामुळे तिच्या या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर फार चर्चा आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदिप खरेरासोबत लग्न केले. ते कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत. पण अचानक त्यांच्या नात्याला नजर लागली आणि दुरावा आला. हा दुरावा इतका वाढला कि थेट घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचला. सध्या मानसी आणि प्रदीप यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच ते या नात्यातून पूर्णपणे विभक्त होतील.