‘तुमचे तेव्हाच ऐकले जाते जेव्हा..’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टवरील कॅप्शन चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अश्विनीच्या या भूमिकेवर प्रेक्षक नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. शिवाय अश्विनी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशी देखील लोकांना प्रिय आहे. ती केवळ एक अभिनेत्री नव्हे तर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारी व्यक्ती आहे. ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ या तिच्या संस्थेअंतर्गत ती विविध कार्यक्रम राबवत असते. तिला ताई म्हणून ओळखले जाते. यामुळे सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

अश्विनी तिच्या समाज कार्यातून नेहमीच लोकांची मदत करत असते. त्यामुळे एक नायिका म्हणून आणि एक कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून तिच्यावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव केला जातो. सोशल मीडियावर अश्विनीचे २३७k पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. जे तिने शेअर केलेल्या पोस्ट पाहतात, लाईक करतात आणि शेअरदेखील करतात. अश्विनी नेहमीच तिच्या पोस्टमधून इतरांना प्रेरणा देणारे संदेश शेअर करताना दिसते. आताही तिची अधिक एक प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अश्विनीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने भाषण करतानाचा एक पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. सोबत तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे कि, ‘तुमचे तेव्हाच ऐकले जाते जेव्हा तुमचे विचार परिपक्व असतात. तुम्हाला मान तेव्हाच मिळतो जेव्हा संकटांशी दोन हात करून तुम्ही पुढे येता. बोलणाऱ्याने बोलत राहावे. ऐकणाऱ्याने ऐकत राहावे. तुम्ही मात्र चालत राहावे’. अश्विनीची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आह आणि यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देखील देत आहेत.