हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर ती एक उत्तम निवेदिका आहे. शिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा स्वतःचा ‘प्राजक्तराज’ नावाचं ज्वेलरी ब्रँड आहे. त्यामुळे प्राजक्ता कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. शिवाय तिचं साडीप्रेम तर सर्वश्रुत आहे. इतक्या गोड अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. पण प्राजक्ताचा ड्रायव्हर मात्र तिला वैतागला आहे. आता तो का वैतागलाय..? काय झालं..? याच उत्तर स्वतः प्राजक्ताने दिलं आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यामुळे याच माध्यमातून ती अनेकदा फोटो, व्हिडीओ, अनुभाव, नवनवीन प्रोजेक्ट्सची माहिती देताना दिसते. अशातच प्राजक्ताने अलीकडेच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये तिने स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये, ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ या जुन्या गाण्यातील ‘मुख़्तसर सी बात है.. तुमसे प्यार है… तुम्हारा इंतज़ार है,’ या ओळी लिहिल्या आहेत.
यानंतर पुन्हा एकदा याच फोटो शूटमधील काही फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ याच गाण्यातील अन्य ओळी लिहिल्या आहेत. ‘दिल बहल तो जाएगा इस ख़याल से..। हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से..। रात ये करार की बेक़रार है । तुम्हारा इंतज़ार है..।’, या ओळी शेअर करत तिने हे गाणं आपण सतत ऐकत असल्याने आपला ड्रायव्हर वैतागल्याचं म्हटलं आहे. या कॅप्शनमध्ये पुढे कंसात तिने लिहिलंय, ‘गाडीमध्ये हे गाणं ऐकून माझा ड्रायव्हर वैतागलाय. मोबाईल ब्लूटूथ कारला कनेक्ट कर रे म्हटल्यावर दुर्लक्ष करतो’. प्राजक्ताच्या या मजेशीर कॅप्शनवर अनेकांनी